तब्बल ८ गुन्हेगारांना तडीपारीचे आदेश..पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची अ‍ॅक्‍शन!

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 24 July 2020

नाशिक शहरात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगारांपासून शहरातील जनतेचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच आगामी सण, उत्सव शांततेत पार पडावेत या करीता अशा गुन्हेगारां विरुध्द हद्दपारी तसेच स्थानबध्दतेची कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नाशिक / सिडको : नाशिक शहरात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगारांपासून शहरातील जनतेचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच आगामी सण, उत्सव शांततेत पार पडावेत या करीता अशा गुन्हेगारां विरुध्द हद्दपारी तसेच स्थानबध्दतेची कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

8 गुन्हेगारांना तडीपारीचे आदेश

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 गुन्हेगारांना तडीपारीचे आदेश जारी करण्यात आले.
या तडीपारांमध्ये शुभम साहेबराव अरगडे, (वय- 20), रा.रामकृष्ण नगर , अंबड , नाशिक व त्याचे टोळीतील टोळी सदस्य इंद्रजित अशोक खुराणा , वय -21, शैलेश गोरखनाथ माळी, (24)  याच्यासह दर्शन उत्तम दोंदे (वय- 22), व त्याच्या टोळीतील टोळी सदस्य, उत्तम संतू दोंदे (वय -47), पिंटू संतू दोंदे, (वय -44), ( टोळी सदस्य ) तसेच विनोद माधव मगर, (वय-24), राहुल चितांमण साळुखे ,(वय - 25), यांचा समावेश असून यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये पोलीस उपायुक्त , परिमंडळ -2 , नाशिक शहर विजय खरात यांनी नाशिक शहर व नाशिक ( ग्रामिण ) जिल्हयातून हद्दपार करणेसाठी आदेश पारित केलेले आहेत .  

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

हेही वाचा > निरक्षर आई- बापाची दिव्यांग लेक सुनिताने शेवटी करून दाखवलचं! पालकांचे आनंदाश्रु थांबेना...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishawas nangre patil ordered Deportation orders for 8 criminals nashik marathi news