#Lockdown : ...अन् बॅरिकेड्सला लावलेल्या 'त्या' दोरखंडाने घेतला निष्पाप बळी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

(म्हसरूळ) सफाई कामगार असलेल्या पत्नीला दुचाकीवरून सोडण्यासाठी सोमवारी (दि. 6) रोजी पहाटे पाचच्या सुमारास पेठरोड शनिमंदिरजवळून जात असताना बॅरिकेड्सला लावण्यात आलेला दोरखंड दिसला नसल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात किशोर चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीर जखमी झालेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नाशिक : (म्हसरूळ) सफाई कामगार असलेल्या पत्नीला दुचाकीवरून सोडण्यासाठी सोमवारी (दि. 6) रोजी पहाटे पाचच्या सुमारास पेठरोड शनिमंदिरजवळून जात असताना बॅरिकेड्सला लावण्यात आलेला दोरखंड दिसला नसल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात किशोर चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीर जखमी झालेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अशी घडली घटना

महापालिका सफाई कर्मचारी राघुबेन किशोर चव्हाण (वय 52) या रविवार कारंजा येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सोडण्यासाठी किशोर समांत चव्हाण (वय 58, रा. साई पुजा रो-हाऊस नं. 11, स्वरगंगा सोसायटी, किशोर सूर्यवंशी मार्ग, आरटीओ कार्यालयाच्यामागे, पंचवटी )हे दुचाकी (एम एच 15 डी. डी. 9931) वरून सफाई करण्यासाठी पहाटे पाचच्या सुमारास आरटीओकडून पेठरोडने रविवार कारंजाकडे जात होते. लॉकडाऊनमुळे शहर परिसरात चौकाचौकात नाकाबंदी करण्यासाठी बॅरिकेड्स व दोरखंडाने रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन केल्यापासून पेठरोडला शनिमंदिराजवळ बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे. संचारबंदी असलेल्या या भागात बॅरिकेड्ला लावण्यात आलेल्या दोरखंडाला चव्हाण दाम्पत्य अडकले. त्यांची दुचाकी घसरून पडली. त्यांनी डोक्यात हेल्मेट नसल्याने त्यांच्या गळ्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडताच येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना अगोदर खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. चव्हाण हे महापालिकेचे सेवानिवृत्त सफाई कर्मचारी होते. 

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

चार महिन्यापूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. या अपघाताची पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत किशोर चव्हाण यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते अशी चर्चा परिसरात सुरू होती.

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A voluntary retired cleaning worker was killed in accident on the spot, while his wife was seriously injured nashik marathi news