नाशिक मुख्य जिल्हा न्यायधीशांची बदली...'हे' आहेत नवे मुख्य न्यायधीश  

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 25 December 2019

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील पाच जिल्हा न्यायधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यात, अलिबागचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश ए.एस. वाघवसे यांची नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश म्हणून बदली झाली आहे. तर, नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश आर. एम. जोशी यांची ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश म्हणून बदली झाली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायधीश आर.एम. जोशी यांची ठाणे येथे मुख्य न्यायधीश म्हणून बदली झाली आहे. तर, अलिबाग जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायधीश ए. एस. वाघवसे हे लवकरच रुजू होणार आहेत. राज्यातील पाच जिल्हा न्यायधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. 

न्या. ए.एस. वाघवसे नवीन मुख्य न्यायधीश 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील पाच जिल्हा न्यायधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यात, अलिबागचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश ए.एस. वाघवसे यांची नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश म्हणून बदली झाली आहे. तर, नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश आर. एम. जोशी यांची ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश म्हणून बदली झाली आहे. त्याचप्रमाणे, नागपूरचे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायधीश व्ही.पी. इंगळे यांची अलिबाग जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश श्रीमती वृषाली व्ही. जोशी यांची कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, अमरावतीचे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायधीश आर.एस. तिवारी यांची लातूर जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

हेही वाचा > सामान्य कुटुंबातील 'स्नेहल' ते 'न्यायाधीश'...थक्क करणारा तिचा 'प्रवास'

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A.S. Waghwase is new Judge of Nashik Court Marathi News