यंदा नाथांची वारी वाहनातून की पायी? तमाम वारकरी मंडळीना प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 25 May 2020

कारण निवृत्तिनाथांनी केलेल्या अभंगात ।। अवीट अमोला घेता पै निमोला। प्रत्यक्ष देखिला भीमातटी, अव्यक्त साकार आकारिले अंकुर, क्षरला चराचर भक्तिकाजे, अनुमान विटे सर्वघटी माजिठे, ते परब्रह्म विटे भक्ति साह्य, निवृत्ती घनवट पिकलिसे पेठ। पुंडलिके प्रगट केले कैसे। याप्रमाणे पंढरीचे महात्म्य वर्णिले आहे.

नाशिक / त्र्यंबकेश्‍वर : "लॉकडाउन'च्या काळात गर्दीत वारीवर निर्बंध कायम असल्याने विश्‍वस्तांसह सदस्यांनी वाहनाद्वारे मूर्ती नेऊन वारी करण्याची परवानगी मागितली आहे. त्याचवेळी विश्‍वस्तांच्या वाहनद्वारे वारीऐवजी दर वर्षीप्रमाणे पायी त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर अशी वारी करणाऱ्या भक्तांनी दहा वारकऱ्यांना पायी वारीची परवानगी द्यावी, असा सूर आळविला असून, तशी तयारीही चालविली आहे. त्यामुळे यंदा नाथांच्या वारीला प्रशासनाकडून कोणत्या अटी- शर्तींवर परवानगी मिळते, याकडे तमाम वारकरी मंडळीचे लक्ष लागून आहे. 

वारीच्या निमित्ताने वेगवेगळ्या मागण्या

पांडुरंग भक्तीचा भुकेला आहे. निवृत्तिनाथ सगळ्या भावांत ज्येष्ठ होत. त्यांनीच सर्वांना विठ्ठल भक्ती दाखविली. त्या भक्तीत दांभिकपणाला थारा नव्हता. त्यामुळे मुदत संपलेल्या विश्‍वस्त मंडळाऐवजी पुजारी व इतर नऊ अशा दहा व्यक्तींना परवानगी दिल्यास आम्ही पायी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत ही वारी पूर्ण करू, असे पर्यायी सुचविले आहेत. येथील विश्‍वस्त मंडळ सदस्यांमध्ये बहुतेकांकडे अद्ययावत वाहने असताना बसचा मागणी कितपत योग्य आहे, अशी टीका करीत, विश्‍वस्तांशिवाय आता आणखी काही इच्छुकांनी पायी वारीची तयारी चालविली आहे. विश्‍वस्त मंडळाची मुदत संपत असल्याने अनेक विश्‍वस्त पदासाठी इच्छुक असलेल्यांनी वारीच्या निमित्ताने वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या आहेत. पुजारी व इतर काही वारकऱ्यांनी पायी वारीची तयारी चालविली आहे. 

हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई

प्रदीर्घ परंपरा 
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांनी इ. स. 1287 मध्ये संजीवन समाधी घेतली. परंतु फार वर्षांपासून त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर पायी वारी सुरू झाली. साधारण 175 वर्षांपासून पायी वारी असल्याची नोंद असली तरी वारी परंपरा त्याहून अधिक वर्षंची असावी. कारण निवृत्तिनाथांनी केलेल्या अभंगात 
।। अवीट अमोला घेता पै निमोला। 
प्रत्यक्ष देखिला भीमातटी, अव्यक्त साकार आकारिले अंकुर, 
क्षरला चराचर भक्तिकाजे, अनुमान विटे सर्वघटी माजिठे, 
ते परब्रह्म विटे भक्ति साह्य, निवृत्ती घनवट 
पिकलिसे पेठ। पुंडलिके प्रगट केले कैसे। 
याप्रमाणे पंढरीचे महात्म्य वर्णिले आहे. दर वर्षी ज्येष्ठ पौर्णिमेच्या आसपास चांदीच्या पादुका व मूर्ती पालखीत व नंतर ती पालखी रथातून पायी पूजक व वारकऱ्यासोबत नेण्याची प्रथा आहे. यंदा लॉकडाउनमुळे वारी पायी होणार की वाहनातून, याविषयी प्रशासकीय परवानगीकडे लक्ष लागून आहे. 

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warkari Waiting for Nath,s wari decision nashik marathi news