'या' धरणांतील साठ्यात २४ तासांत चार टक्क्यांनी वाढ; नद्याकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

gangapur dam.jpg
gangapur dam.jpg
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सातत्य राखले आहे. त्यामुळे धरणांमधून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नद्यांच्या काठी असलेल्या गावांतील रहिवाशांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मोठे आणि मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २४ तासांपूर्वी जलसाठा ५८ टक्के होता. तो आता ६२ टक्के झाला आहे. 

नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळले

गेल्या वर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तो ८८ टक्के होता. गंगापूरमधील साठा ८० टक्क्यांपर्यंत पोचल्याने नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळल्याचे मानले जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे नदीकाठच्या रहिवाशांनी घ्यावयाच्या खबरदारीविषयीची माहिती प्रसिद्धीला दिली आहे. त्यानुसार सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याची तयारी ठेवावी. नदीपात्रापासून दूर राहावे. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. जमिनीखालून जाणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. पुराच्या संपर्कात आलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. भूस्सखलन, दरडी कोसळण्याची शक्यता असते. 

नद्याकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा 

डोंगर पायथ्याशी राहणाऱ्यांनी दक्षता घेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. घाट, डोंगर, रस्ते, अरुंद गल्ली, दरी-खोऱ्यांमधून प्रवास टाळावा. धरण, नदी, धबधबे, डोंगरमाथा, घाट कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये. सद्यःस्थितीत धरणातून सुरू असलेला विसर्ग क्यूसेकमध्ये याप्रमाणे : दारणा- ११ हजार ५५०, भावली- २९०, भोजापूर- १९०, नांदूरमध्यमेश्‍वर- ११ हजार ७९, हरणबारी- एक हजार ६४३, माणिकपुंज- २५०. गंगापूर धरणातून अद्याप पाणी सोडण्यात येत नसले, तरीही नाशिकमधील होळकर पुलाखालून गोदावरीमधून ३८ हजार ८९७ क्यूसेक विसर्ग सुरू होता. 

७१ टक्के पावसाची नोंद 

जिल्ह्यात आतापर्यंत ७०.९६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर १२०.८१ टक्के पाऊस झाला होता. सोमवारी सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत सतत अतिवृष्टी झालेल्या इगतपुरी तालुक्यात ४३ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिकमध्ये ६.४, दिंडोरीत ७, पेठमध्ये २७.२, त्र्यंबकेश्‍वरमध्ये ४०, मालेगावमध्ये ६, नांदगावमध्ये ७, चांदवडमध्ये ९, कळवणमध्ये २०, बागलाणमध्ये ८, सुरगाण्यामध्ये २४.१, देवळ्यात ८.८, निफाडमध्ये ०.८, सिन्नरमध्ये ४, येवल्यात ७ मिलिमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी अशी : नाशिक- ७१.४६, इगतपुरी- ८३.५२, दिंडोरी- ५८.७५, पेठ- ४६.०३, त्र्यंबकेश्‍वर- ४६.९०, मालेगाव- १३३.९६, नांदगाव- १०७.२६, चांदवड- ७१.९७, कळवण- ६३.४८, बागलाण- १३१.०९, सुरगाणा- ४६.५३, देवळा- ९४.३२, निफाड- ७८.८१, सिन्नर- ११५.६३, येवला- ९३.६९.

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क 

जिल्हा नियंत्रण कक्ष : टोल फ्री- १०७७ आणि (०२५३) २३१७१५१, २३१५०८० 
शहर पोलिस नियंत्रण कक्ष : टोल फ्री- १०० आणि (०२५३) २३०५२३३, ३४, ३८, २३०५२०१, २३०५२००, २३०५२०५, २३०५२४६. 
ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष : (०२५३) २३०९७१५, २३०३०४४, २३०३०२१, २३०९७००. 
नाशिक महापालिका नियंत्रण कक्ष : टोल फ्री- १०१, १०२ आणि (०२५३) २५७१८७२, २५८९०८७१, २५९२१०१, २५९२१०२, २२२२४१३. 
मालेगाव पोलिस नियंत्रण कक्ष : (०२५५४) २३१००० 
मालेगाव महापालिका नियंत्रण कक्ष : (०२५५४) २३१९५०, २३४५६७, २२०९९०४, ९८२३३३९२७५ 
नाशिकचे जिल्हा रुग्णालय : रुग्णवाहिका टोल फ्री- १०८ आणि (०२५३) २५७२०३८, २५७३९३६, २५७६१०६.  

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com