esakal | 'लासलगाव पाणीपुरवठा योजना आराखड्याला मंजुरी मिळवणार'  - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

water supply scheme for lasalgaoan will be approved says bhujbal nashik marathi news

नव्या आराखड्यास मंजुरी मिळेपर्यंत योजनेच्या पाईपलाईनचे जिल्हा परिषदेमार्फत तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना भुजबळ यांनी दिले.

'लासलगाव पाणीपुरवठा योजना आराखड्याला मंजुरी मिळवणार'  - छगन भुजबळ

sakal_logo
By
अरुण खंगाळ

नाशिक/लासलगांव : लासलगाव हराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासोबत चर्चा करून मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

भुजबळ फार्म (नाशिक) येथे झालेल्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, गटविकास अधिकारी संदीप कराड, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता संजय मिस्त्री, विस्तार अधिकारी एस.के.सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, लासलागावचे माजी उपसरपंच संतोष ब्रम्हेचा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता एम.एस.गणेशे, शाखा अभियंता अमोल घुगे, पांडुरंग राऊत, विजय सदाफळ आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

१५ कोटींचा आराखडा मंत्रालय स्तरावर

सोळागाव योजनेची पाईपलाईन १५ ते २० वर्ष जुनी असलेली पाईपलाईन खराब झाल्याने अनेकदा लिकेजचे प्रश्न निर्माण होत असतात. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी विधानसभेच्या सभागृहात विषय मांडला होता. त्यानुसार सदर योजनेसाठी नवीन पाईपलाईन लाईन टाकणे व विजबिल खर्च कमी करण्यासाठी सौर प्रकल्प बसविण्यास मंजुरी मिळाली होती. एकूण १५ कोटींचा आराखडा मंत्रालय स्तरावर आहे.

पाईपलाईनची त तातडीने दुरुस्ती 

नव्या आराखड्यास मंजुरी मिळेपर्यंत योजनेच्या पाईपलाईनचे जिल्हा परिषदेमार्फत तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना भुजबळ यांनी दिले. या संदर्भात बैठकीतूनच दूरध्वनीवरून पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजय चहांदे यांसोबत चर्चा केली. पाणी पुरवठ्याची वीज खंडित होऊन अनेक नवनवीन प्रश्न तयार होत असतात. यावर उपाय म्हणून हा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. तसेच धुळगाव, राजापूर आणि मनमाड येथील पाणीपुरवठा योजनेची माहिती घेत त्यांचेही आराखडे तयार करण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

संपादन - रोहित कणसे