मध्यरात्री तीनलाच "दोघांनी" घातली गळ्यात माळ... उरकले शुभमंगल सावधान ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

रायपाडा येथील मंगा कामडी यांची कन्या सुलभा (काजल) आणि देवगावचे भाऊ गोहिरे यांचा मुलगा सचिन यांची हळद शनिवारी (ता. 21) होती. रविवारी त्यांचा विवाह होणार होता. त्यासाठी निमंत्रणपत्रिकांचे वाटपही करण्यात आले होते. श्रमजीवी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचा विवाह मध्यरात्री करण्याचा निर्णय घेतला.पण...

नाशिक : देवगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे रविवारी (ता. 22) आदिवासी तरुणाईचे तीन विवाह होणार होते. मात्र, जनता "कर्फ्यू'च्या पार्श्‍वभूमीवर मोजक्‍या वऱ्हाडींच्या साक्षीने मध्यरात्री तीनला शुभमंगल झाले. साध्या पद्धतीने आदिवासींनी आपल्या जीवनातील पुढच्या वाटचालीची केलेली सुरवात जिल्हाभरात कौतुकाचा विषय झाला आहे. 

मोजक्‍या वऱ्हाडींच्या साक्षीने शुभमंगल!
रायपाडा येथील मंगा कामडी यांची कन्या सुलभा (काजल) आणि देवगावचे भाऊ गोहिरे यांचा मुलगा सचिन यांची हळद शनिवारी (ता. 21) होती. रविवारी त्यांचा विवाह होणार होता. त्यासाठी निमंत्रणपत्रिकांचे वाटपही करण्यात आले होते. श्रमजीवी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचा विवाह मध्यरात्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोजक्‍या वऱ्हाडींच्या साक्षीने सुलभा अन्‌ सचिन विवाहबद्ध झाले. बारकू वारे, अंकुश वारे, युवराज वारे यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

जगभर थैमान घालणारा कोरोना विषाणूबाधित एकही रुग्ण अद्याप नाशिकमध्ये नाही. शनिवारी (ता. 21) दाखल झालेल्या कोरोना संशयिताच्या स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झालेला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात एकही कोरोना संशयित नाही. दरम्यान, स्वाइन फ्लू विशेष कक्षामध्ये मात्र सहा रुग्ण असून, दोघे पॉझिटिव्ह, तर चौघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wedding ceremony at midnight 3 pm due to Corona virus Nashik Marathi News