esakal | संसर्ग आहे जहरी, सर्व रहा आपापल्या घरी! अनोख्या लग्नपत्रिकेची सोशल मिडियावर चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (74).jpg

यमराज कृपेने एका विषाणूचा संसर्ग झालेला असून सदरील विषाणू भारतातून हकालपट्टीसाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन सुरुवातीला केले आहे.

संसर्ग आहे जहरी, सर्व रहा आपापल्या घरी! अनोख्या लग्नपत्रिकेची सोशल मिडियावर चर्चा

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : सोशल मीडियावर कधी प्रबोधनात्मक तर कधी टीकात्मकरित्या फिरणारे संदेश लक्षवेधी चर्चेत येणारे असतात..अशीच एक लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर फिरते आहे ती,कोरोना व मृत्यूबाई यांच्या शुभविवाहाची..या पत्रिकेने सर्वांचे लक्ष वेधले असून मनोरंजनातून प्रबोधनही होत असल्याने जोरदारपणे ही पत्रिका व्हायरल होत आहे.

जोरदारपणे ही पत्रिका व्हायरल

लोकांना सोप्या भाषेत सांगितलेले कळत नाही,उलट टोमणे मारले की सहज समजते असे म्हटले जाते.कदाचित याच हेतूने ही पत्रिका तयार झाली असावी. येथील अभिनव फाउंडेशन व उदय प्रिंटींग यांनी पत्रिकेची डिझाईन करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली असून चांगलीच चर्चेत आली आहे.
यमराज कृपेने एका विषाणूचा संसर्ग झालेला असून सदरील विषाणू भारतातून हकालपट्टीसाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन सुरुवातीला केले आहे. तर वर चि. कोरोना हे घातकराव नाईलाजराव विषाणू,रा.- चीन यांचे दत्तक कुपुत्र व वधू मृत्यूबाई या यमदूतराव मरणराव इहलोके,रा. - स्वर्गबाजार यांची सुकन्या यांचा संसर्गजन्य शुभविवाह आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

जा-जा पत्रिका मार भरारी, जाऊन सांग सोयऱ्यांच्या घरी,
जा-जा पत्रिका मार भरारी, जाऊन सांग सोयऱ्यांच्या घरी, विषाणूचा संसर्ग फार आहे जहरी, सर्वजण रहा आप-आपल्या घरी...तरी आपण सहकुटुंब सहपरिवार घरातच रहावे ही नम्र विनंती असे आवाहन यात केले आहे.आरोग्य विभागाच्या विनंतीस मान देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती असे आवाहन प्रशासनाच्या वतीने पत्रिकेत केले आहे.विवाह स्थळ सर्व गर्दीच्या जागा आणि विवाह मुहूर्त संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्या आल्या लगेच असा अफलातून टाकलेला आहे. तर आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं.. असे आवाहन चि.ताप,खोकला,सर्दी, महामारी यांनी केले आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

कोरोनापासून बचावाचे केलेले आवाहन चांगलेच चर्चेत
या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केलेले आवाहन आणि कोरोनापासून बचावाचे केलेले आवाहन चांगलेच चर्चेत आले असून त्यातून प्रबोधनही होत आहे.याचमुळे नागरिक स्वतःहून ही पत्रिका व्हायरल करत आहेत.