लेटलतिफांची उडाली धांदल!...आमदार म्हणे, 'कारण नंतर आधी गुलाब घ्या!'

लेटलतिफांचे स्वागत.jpg
लेटलतिफांचे स्वागत.jpg

नाशिक : (नांदगाव) सर्वसामान्यांच्या प्रलंबित समस्यांचे कार्यालयीन वेळेत निराकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार सुहास कांदे यांनी गुरुवारी (ता. 20) नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारासमोरच गांधीगिरी केली. हातात गुलाबपुष्प व गुच्छ घेऊन स्वागतासाठी आमदारांना बघून नेहमीप्रमाणे रेल्वेने नांदगाव गाठण्याची सवय असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर खजील होण्याची नामुष्की ओढविली. अनेक लेट लतिफांची उशीर का झाला? याचे स्पष्टीकरण देतांना मोठी त्रेधातिरपीट उडाली. 

उशिराने येणे व लवकर निघून जाणे प्रकार

गुरुवार आठवडेबाजाराचा दिवस असून, तालुक्‍यातून नागरिक कामासाठी येतात. मात्र, महसूल, पंचायत समितीसह विविध कार्यालयांत कामे खोळंबून राहतात. याबाबत तक्रारी वाढू लागल्याने आमदार कांदे यांनी दखल घेत प्रशासकीय संकुल गाठले. सकाळी पावणेदहाची कार्यालयीन वेळ झाल्यावरही अनेक अधिकारी-कर्मचारी साडे अकराच्या पुढे उपस्थित होत असल्याचे बघून आमदारांनाही अवाक होण्याची वेळ आली. अप-डाउन करणाऱ्या अनेक मंडळींनी घरभाडे भत्ता मिळत असल्याचे सांगि तले. मात्र, मुख्यालयी उशीर होण्यामागचे खुलासे केल्याने आमदार कांदे यांनी खाते प्रमुखांना उशीर करणाऱ्यांना नोटिसा काढण्याची सूचना दिली. यापुढे शिवसैनिक दैनंदिन आढावा घेणार असून, जनतेची कामे अडवून ठेवू नका, अशा शब्दांत आमदार कांदे यांनी संबंधित लेटलतिफांची कानउघाडणी केली. 

तक्रार करून काम होत नसल्याच्या तक्रारी करण्यात अग्रेसर असलेले कर्मचारी

उशिराने येणे व लवकर निघून जाणे या वाढत्या प्रकारांमुळे तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणेचे कामकाज विवादात सापडले आहे. आधीच विविध शासकीय विभागांमध्ये मंजूर पदांपेक्षा कार्यरत पदांची संख्या कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर नेहमी रिक्त पदांची तक्रार करून काम होत नसल्याच्या तक्रारी करण्यात अग्रेसर असलेले कर्मचारी वेळेबाबत किती गंभीर असतात, हे गुरुवारी सोदाहरण दिसून आले. 

'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' अशी परिस्थिती 

खुद्द नायब तहसीलदार गायकवाड साडेअकराला आले. आमदारच गेटवर उभे असल्याचे बघितल्याने भांबावलेल्या काहींनी बहाणेबाजी करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतर "आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' अशी परि स्थिती उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. अंगणवाडीच्या वरिष्ठ कर्मचारी श्रीमती गजभिये यांनी डॉक्‍टरवाडीच्या अंगणवाडीस भेट दिल्याने उशीर झाल्याचे सांगितले. खात्री करून घेण्यासाठी त्यांनी दिलेला अंगणवाडीसेविकेचा नंबर चुकीचा निघाला. संजय गांधी योज नेचे नायब तहसीलदार राजू गायकवाड, लिपिक समाधान पवार अशी काही नावे उशिरा च्या यादीत असली, तरी अर्ज न देता अनुपस्थित असलेल्या यादीत कूळकायदा अव्वल कारकून पी. आर. नकले व शिपाई पवार आहेत. 

पंचायत समितीत सामान्य प्रशासनाचे कनिष्ठ सहाय्यक कुरेशी व परदेशी, बांधकाम विभागाचे वरिष्ठ सहाय्यक सुरसे, सहकार विभाग कनिष्ठ सहाय्यक पी. जे. पाटील व गरुड, एम. एच. पाटील, ए. व्ही. पवार, शाखा अभियंत्यांची नोंद उशिराने येणाऱ्यांसाठी असलेल्या हजेरी पत्रकात झाली व त्यांचा गांधीगिरीने सत्कार झाला. शिवसेना तालुका प्रमुख व नगरसेवक किरण देवरे, संतोष बळीद, सुनील जाधव, राजाभाऊ जगताप, सागर हिरे, प्रमोद भाबड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com