राग झाला अनावर! पत्नीकडून पतीवर प्राणघातक हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल

विनोद बेदरकर
Saturday, 24 October 2020

भारतनगरमधील घटना...पतीने पत्नीला सांगायचा उशीर की थेट तिने पतीवरच केले वार. भरदुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ. 'कवड्या खेळू नकोस, यामुळे घरात वाद होतात' बोलायचा उशीर की पत्नीने घेतला धक्कायक निर्णय...

नाशिक : भारतनगरमधील घटना...पतीने पत्नीला सांगायचा उशीर की थेट तिने पतीवरच केले वार. भरदुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ. 'कवड्या खेळू नकोस, यामुळे घरात वाद होतात' बोलायचा उशीर की पत्नीने घेतला धक्कायक निर्णय...

अशी आहे घटना

गुरूवारी (ता. 22) दुपारी भारतनगर परिसरात धक्कादायक घटना घडली. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आर्श्चय व्यक्त होत आहे. घराबाहेर कवड्या खेळणार्‍या पत्नीस बोलल्याचा राग आल्याने पत्नीने थेट पतीवर चाकूने हल्ला केला. मुस्ताक खालिद सैय्यद (रा. भारतनगर, मुंबईनाका) असे जखमी तक्रारदार पतीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी दुपारी घराबाहेर कवड्या खेळत असतांना सैय्यद यांनी 'कवड्या खेळू नकोस, यामुळे घरात वाद होतात' असे पत्नीस बोलले. याचा राग आल्याने पत्नीने घरातील भाज्या चिरण्याचा चाकू आणून सैय्यद यांच्या मानेवर, खांद्यावर, हातावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

घटनेने कुटुंबियांसह परिसरात आर्श्चय व्यक्त होतंय. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wife stabbed her husband with a sharp knife nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: