राज्यातील आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेलेले आहेत. काही घरे देखील दोन-दोन दिवस पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडून प्रती कुटुंब १० किलो गहू,१० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.

नाशिक : महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशी परिस्थिती असताना ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे. अशा निराधार कुटुंबाना मोफत अन्न धान्य पुरवठा करणार असल्याची माहिती सोमवारी (ता. 19) रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

शासन निर्णयानुसार मदत देणार

महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातल्या अनेक भागांमध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आज मी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असे छगन भुजबळ म्हणाले. महाराष्ट्रातील विविध भागात की ज्यात सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेलेले आहेत. काही घरे देखील दोन-दोन दिवस पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडून प्रती कुटुंब १० किलो गहू,१० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

राज्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्न धान्य वाटप करण्याबाबतच्या ०८ मार्च २०१९ च्या (सीएलएस-२०१८/प्र.क्र.२२५/म-३) शासन निर्णयानुसार ही मदत देणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will provide free rations to the disaster victims in the state nashik marathi news