....अन् तीन पिढ्यांच्या वाटसरूंचा साक्षीदार कोसळला..परिसरात हळहळ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

वाटसरूंना तप्त उन्हात सावली देणारा... परिसरातील शेकडो जनावरांना, पक्ष्यांना पाने व आपल्या सावलीने शांत करणारा... मुलांना सूरपारंब्यासाठी अंगाखांद्यावर खेळवणारा... तसेच गावोगाव भटकंती करून पोटाची खळगी भरणाऱ्या शेकडो कुटुंबाचे हक्काचे मुक्कामाचे स्थान बनलेला हा साक्षीदाक कोसळल्याने सर्वांना चटका लावला.

नाशिक / येवला : अनेक वाटसरूंना तप्त उन्हात सावली देणारा... परिसरातील शेकडो जनावरांना, पक्ष्यांना पाने व आपल्या सावलीने शांत करणारा... मुलांना सूरपारंब्यासाठी अंगाखांद्यावर खेळवणारा... तसेच गावोगाव भटकंती करून पोटाची खळगी भरणाऱ्या शेकडो कुटुंबाचे हक्काचे मुक्कामाचे स्थान बनलेला हा वटवृक्ष कोसळल्याने सर्वांना चटका लावला. अनेक जुन्या वाटसरूंना रस्त्याची खूण म्हणून हा रस्ता तळवाडे भारमकडेच जाणारा आहे, असे दर्शवणारा "मैल स्टोन' निसर्ग चक्रीवादळात उन्मळून पडल्याची घटना चटका लावणारी ठरली. 

वाटसरूंचा जणू आधारवड गेला...! 

येवला- भारम रस्त्यावर तळवाडे रेल्वे गेटच्या पुढे डाव्या बाजूला अनेक वर्षांचा जुना बहारदार वटवृक्ष शुक्रवारी वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी चक्रीवादळात उन्मळून पडला. अनेक उन्हाळे, पावसाळे झेललेला हा वृक्ष पडल्याने गावातील आबालवृद्धांना दुःख झाले. ज्या वडाच्या सावलीत आज नव्वदीत असलेले ज्येष्ठ त्यांच्या बालपणीचे अनुभव ऐकविताना हळहळले. वाटसरूंचा जणू आधारवड गेला, या आणि अशा शब्दात इलेक्‍ट्रिक व्यावसायिक शकील पठाण, रंभाजी आरखडे, नवाब पटेल, सरवर पटेल, नंदू आरखडे, शकूर पटेल, अरविंद आरखडे आदींनी प्रतिक्रिया नोंदविल्या. 

हेही वाचा > धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण?

हेही वाचा > संजय राऊत ऐकलतं का?...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Witness the tree fall of three generations nashik marathi news