विवाहिता विहिरीवर पाणी आणायला गेली अन् अनर्थ घडला...परिसरात हळहळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

शेतकरी महिला दुपारपर्यंत आपल्या शेतात काम करीत होती. दुपारी जेवणासाठी जवळच असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणायला गेली अन् अनर्थ घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक / चांदवड : शेतकरी महिला दुपारपर्यंत आपल्या शेतात काम करीत होती. दुपारी जेवणासाठी जवळच असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणायला गेली अन् अनर्थ घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

असा घडला प्रकार

महिलेचे नाव कल्याणी किरण गांगुर्डे असून, ही शेतकरी महिला दुपारपर्यंत आपल्या शेतात काम करीत होती. दुपारी जेवणासाठी जवळच असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी आणायला गेली अन् अनर्थ घडला.  विहिरीवर दोर बादलीच्या सहाय्याने पाणी ओढताना तिचा पाय घसरला. यामुळे तोल जाऊन ती विहिरीत पडली. तिला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडाली. त्यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने तिला विहिरीतून वर काढत तत्काळ मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने निमोण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

घटनेचा तपास चांदवड पोलिसांकडे

निमोण येथील तरुण शेतकरी महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेचा तपास चांदवड पोलिस करीत आहेत, तर घटनास्थळी पोलिस शिपाई उत्तम गोसावी यांनी पंचनामा केला. 

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman Falling into a well and dying at Nimon nashik marathi news