विषण्ण करणारा अनुभव! चक्क तरुणांवर महिलेची प्रसुती करण्याची वेळ; असाही प्रसंग

संजीव निकम
Monday, 21 September 2020

रेल्वे फाटकावर रविवारी (ता.२०) रात्री सव्वानऊच्या सुमारास प्रसववेदनांनी पीडित गर्भवतीने गोंडस बालकाला जन्म दिला. भररस्त्यावर एखाद्या महिलेची प्रसूती होण्याचा शहरातील हा पहिलाच प्रसंग. त्यानंतर...

नाशिक / नांदगाव: येथील रेल्वे फाटकावर रविवारी (ता.२०) रात्री सव्वानऊच्या सुमारास प्रसववेदनांनी पीडित गर्भवतीने गोंडस बालकाला जन्म दिला. भररस्त्यावर एखाद्या महिलेची प्रसूती होण्याचा शहरातील हा पहिलाच प्रसंग. 

शेवटी या मुलांनीच कापड लावत आडोसा लावला

नांदगाव रेल्वे फाटकावर रविवारी (ता.२०) रात्री सव्वानऊच्या सुमारास प्रसववेदनांनी पीडित गर्भवतीने गोंडस बालकाला जन्म दिला. भररस्त्यावर एखाद्या महिलेची प्रसूती होण्याचा शहरातील हा पहिलाच प्रसंग. प्रसूत वेदनांनी त्रस्त महिलेच्या मदतीसाठी भूषण मराठे, सूरज फुलारे, श्‍याम चव्हाण, प्रमोद पगारे व जफर शेख ही युवा मंडळी धावून आली. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष नाना जाधव यांना याबाबत माहिती दिली. प्रमोद पगारेंनी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेला कळविले. मात्र रुग्णवाहिका येईपर्यंत प्रसवकळांनी बेजार झालेल्या या अबलेने एका गोंडस बालकाला जन्मही दिला. विशेष म्हणजे आजूबाजूच्या महिलांना मदतीसाठी बोलावूनही एकही महिला पुढे आली नाही. शेवटी या मुलांनीच कापड लावत आडोसा केला. १०८ रुग्णवाहिकेसोबत असणारे डॉ. इकबाल शेख यांनी प्रथमोपचार केले. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

असहाय महिलेच्या मदतीला धावले नांदगावचे तरुण ​
ही महिला अस्वलदरा या फासे पारध्यांच्या गावातील असून, रेल्वे फाटक परिसरातच रुद्राक्ष विक्री करून चरितार्थ चालतो, अशी माहिती मिळाली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माणुसकी हरवत चालली, असे बोलले जाते. मात्र वेदनेने विव्हळत याचना करणाऱ्या या अबलेच्या मदतीला बघ्यातील एकही महिला पुढे येत नसल्याचा अनुभव विषन्न करणारा होता, अशी प्रतिक्रिया या मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष नाना जाधव यांनी दिली. महिला पुढे येत नसल्याचे बघून या युवकांनी केलेल्या मदतीचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman gives birth child at railway station nandgaon nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: