"वासनांनी भरल्या नजरा रोज देहावर झेलते." भय इथले थांबेच ना...!

woman molest 1111.jpg
woman molest 1111.jpg

नाशिक : शहरात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये पीडितांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. एकीचा सोशल मीडियावरून तर दुसरीचा बलात्काराचा तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत विनयभंग केला असून तिसऱ्या घटनेत बापलेकांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

शहर परिसरात तिघींचा विनयभंग..शारीरिक संबंधाच्या उद्‌देशाने अंगलटपणा​

खासगी नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पीडितेशी अंगलटपणा करणारा मुलगा व त्यास प्रोत्साहन देणाऱ्या बाप या दोघांविरोधात उपनगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरज व नारायण कुट्टी-नायर असे संशयित बापलेकाची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडिता 2017 ते 2020 या दरम्यान अशोक हॉस्पिटल, हॉटेल लॅन्डमार्क यासह संशयिताच्या घरी संशयित निरज याने अंगलटपणा केला. तसेच पीडितेला आई व भावाला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंधाच्या उद्‌देशाने अंगलटपणा करीत विनयभंग केला. तर निरजचे वडील नारायण कुटटी-नायर याने निरज चांगला मुलगा असून तो तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आमिष दाखवून त्यास मदतच केली. याप्रकरणी उपनगर पोलिसात दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक उपनिरीक्षक परदेशी हे तपास करीत आहेत. 

बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी केलेला विनयभंग

उपनगर परिसरात पीडितेने संशयित निलेश दिनकर उन्हवणे (34, रा. त्रिमूर्ती चौक) याच्या विरोधात यापूर्वीच बलात्काराची तक्रार उपनगर पोलिसात दिली आहे. त्याप्रकरणी संशयित उन्हवणे याने गेल्या रविवारी (ता.23) रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास विठ्ठल मंगल कार्यालय येथे पीडितेला गाठून तिच्या गळ्यातील ओढणीने ओढून घेत "उपनगर पोलिसात दिलेली बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत पीडितेचा हात पिरगळून विनयभंग केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार चौधरी हे करीत आहेत.

व्हिडिओ कॉलवरून अश्‍लिल चाळे

तर, तिसरा विनयभंगाचा गुन्हा सायबर पोलिसात दाखल आहे. संशयिताने पीडितेच्या मोबाईलवर व्हॉटसऍपद्वारे कॉल केला आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तसेच त्याने व्हिडिओ कॉलवरून अश्‍लिल चाळे करीत पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न करीत विनयभंग केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे हे तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com