थरारक! वळणावर जीप जागीच उलटी...महिला ठार..१० जखमी..

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

इगतपुरीकडून आंबेवाडीमार्गे राजूरकडे प्रवासी घेऊन जाणारी काळी-पिवळी जीप (एमएच 15, ए 2212) खडकेद, मांजरगाव शिवारातील वळणावर असताना चालक लक्ष्मण नागरे (घोटी) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वळणावर जीप जागीच उलटी झाली.

नाशिक : इगतपुरी तालुक्‍यातील खडकेद-आंबेवाडी मार्गावर इगतपुरीहुन राजूरकडे जाणाऱ्या काळी-पिवळी चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने जीप उलटी झाली. या अपघातात एक प्रवासी महिला जागीच ठार झाली, तर इतर प्रवासी जखमी झाले. 

अशी घडली घटना...

अधिक माहितीनुसार, इगतपुरीकडून आंबेवाडीमार्गे राजूरकडे प्रवासी घेऊन जाणारी काळी-पिवळी जीप (एमएच 15, ए 2212) खडकेद, मांजरगाव शिवारातील वळणावर असताना चालक लक्ष्मण नागरे (घोटी) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वळणावर जीप जागीच उलटी झाली. या अपघातात जीपमधील प्रवासी प्रभाबाई अंबादास बागुले (वय 70, रा. अंबरनाथ, ठाणे) यांच्या डोक्‍यास गंभीर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर ताराबाई कुंदे, गंगूबाई घारे, सुमनबाई घारे (सर्व रा. काळुस्ते), रवी शिंदे (घोटी), विठ्ठल कवटे (मवेशी, ता. अकोले), सखूबाई सदगीर (टाकेहर्ष), ताराबाई सदगीर (रा. वाडा), कुसुम झडे (भंडारदरा), नामदेव झडे (भंडारदरा), पूनम बोंदर (अंबरनाथ) जखमी झाले. जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा > PHOTOS : "तूच का पेटवून घेते, मीच पेटवून घेतो' असे म्हणून तिच्या हातातील बाटली ओढली...पण...

अपघाताची बातमी कळताच घोटी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंदा माळी, विलास घिसाडी, पोलिस कर्मचारी अनिल धुमसे, संतोष दोंदे, शीतल गायकवाड यांनी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना घोटी रुग्णालयात हलविले. याबाबत मनोहर बोंदरे यांच्या फिर्यादिवरून पोलिसांनी जीपचालक नागरे यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा > 'सर, याच्याकडे बंदूक आहे!'...अन् शाळेत उडाली खळबळ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman killed in road accident on Khakhed-Ambewadi Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस