म्हाडा वसाहतीत विवाहिता मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; इंदिरानगर परिसरातील घटना

राजेंद्र बच्छाव
Saturday, 24 October 2020

पाथर्डी फाटा भागात असलेल्या म्हाडा वसाहतीत धक्कादायक घटना उघडकीस आली. सी विंगमधील एका विवाहिता मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 

नाशिक : (इंदिरानगर) पाथर्डी फाटा भागात असलेल्या म्हाडा वसाहतीत धक्कादायक घटना उघडकीस आली. सी विंगमधील एका विवाहिता मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 

असा आहे प्रकार

प्रणाली भरत जाधव (वय 26, रा. सदनिका क्रमांक 1002, सी विंग, म्हाडा वसाहत) यांचा पती दुपारी अडीचला घरी आला. घरात पाऊल ठेवताच पत्नी मृत झाली असे ओरडतच बाहेर पडला. त्यामुळे आसपासचे नागरिक तेथे जमा झाले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असून उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर आणि अधिकारी मृत महिलेच्या घरातच चौकशी करत आहेत. अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेले नाही. फॉरेन्सिक तज्ञांची टिमदेखील पाचारण करण्यात आली असून सर्व बाबींची शक्यता पडताळण्यात येत आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

सदर महिलेचा मृतदेहदेखील आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून हे जोडपे येथे राहात असल्याची माहिती आसपासच्या नागरिकांनी दिली असून घरातील मोबाईल आदी साहित्य देखील चोरीला गेल्याची चर्चा सुरू होती.

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman was found dead in Mhada Colony nashik marathi news