esakal | धक्कादायक वास्तव ! प्रसूतीसाठी मालेगावला गेली महिला अन् 'या' शहराला लागले वेगळेच वळण!
sakal

बोलून बातमी शोधा

pregnent woman corona.jpg

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पोरगळपणामुळे प्रसूतीसाठी एक महिला मालेगावला गेली अन येथूनच शहराला वेगळे वळण मिळाले.किंबहुना पुढे जाऊन हाच आरोग्य विभाग इतका निष्काळजी बनला की आज या विभागातील डॉक्टर,परिचारिका व संबंधित १४ जण कोरोना बाधित होऊन बसले असून महाराष्ट्रातील ही पहिली घटना असावी. त्यामुळे ज्यांच्यावर गावाच्या आरोग्याची जबाबदारी होती,त्यांच्यामुळेच आज 'हे' गाव कोरोनाच्या निशाण्यावर आले आहे.

धक्कादायक वास्तव ! प्रसूतीसाठी मालेगावला गेली महिला अन् 'या' शहराला लागले वेगळेच वळण!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / येवला : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पोरगळपणामुळे प्रसूतीसाठी एक महिला मालेगावला गेली अन येथूनच शहराला वेगळे वळण मिळाले.किंबहुना पुढे जाऊन हाच आरोग्य विभाग इतका निष्काळजी बनला की आज या विभागातील डॉक्टर,परिचारिका व संबंधित १४ जण कोरोना बाधित होऊन बसले असून महाराष्ट्रातील ही पहिली घटना असावी. त्यामुळे ज्यांच्यावर गावाच्या आरोग्याची जबाबदारी होती,त्यांच्यामुळेच आज 'हे' गाव कोरोनाच्या निशाण्यावर आले आहे.

धक्कादायक वास्तव...

लोकं मालेगावला जायला घाबरत असताना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पोरगळपणामुळे प्रसूतीसाठी एक महिला मालेगावला गेली अन् येथूनच शहराला वेगळे वळण मिळाले.किंबहुना पुढे जाऊन हाच आरोग्य विभाग इतका निष्काळजी बनला की आज या विभागातील डॉक्टर,परिचारिका व संबंधित १४ जण कोरोना बाधित होऊन बसले असून महाराष्ट्रातील ही पहिली घटना असावी. त्यामुळे ज्यांच्यावर गावाच्या आरोग्याची जबाबदारी होती,त्यांच्यामुळेच येवला कोरोनाच्या निशाण्यावर आले आहे.

एक छोटीशी चूक अख्ख्या येवल्याला वेठीस धरणारी
साधारणत: १९ मार्चपासून येथील व्यवहार महाराष्ट्र शासनाच्या लॉकडाऊनमुळे बंद होऊ लागले तर २३ मार्चपासून पूर्ण तालुकाच लॉकडाऊन झाला. येथील नागरिकांनी आपल्या दारात कोरोना यायलाच नको असा चंगच बांधला. मात्र एक छोटीशी चूक अख्ख्या येवल्याला वेठीस धरणारी ठरले. येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका मुस्लीम महिलेला नाशिकला जाणे आवश्यक असताना येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बेदरकार वृत्तीमुळे ही महिला मालेगावला प्रसूतीला गेली आणि तेथूनच कोरोनाचा प्रसाद येवल्यात पोहोचला. या महिलेची सासू साधारणतः २४ एप्रिलला बाधीत सापडली आणि लगेच २६ एप्रिलला त्या महिलेच्या कुटुंबातील ५ जण पॉझिटीव्ह सापडल्याने येवलेकराच्या तोंडचे पाणीच पळाले. यावरच ब्रेक लावावा अशी देवाकडे याचना करणाऱ्या येवलेकराना पुन्हा ५ मेला धक्काच बसला. कारण एकाच वेळी तब्बल १६ कोरोना बाधित निघाले होते.

आज तर हा आकडा २५ पर्यंत पोहोचल्याने पुढे काय?

आज तर हा आकडा २५ पर्यंत पोहोचल्याने जिल्ह्यातील हा एकमेव तालुका दोन अंकी संख्या पर्यंत पोहोचल्याने पुढे काय हा प्रश्न घराघराला सतावत आहे.विशेष म्हणजे येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव असल्याने आरोग्य विभागच बाधित होऊन १४ जणावर उपचार घेण्याची वेळ आली आहे तर अनेक जण कोराटाईन होऊन बसल्याने इतरांची देखभाल करणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांनी गावाला काळजी घ्यायची शिकवायला हवी,तोच आरोग्य विभाग कसा इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित होऊ शकतो याचे उत्तर मात्र निष्काळजीपणा एवढेच आहे.अजूनही या अधिकाऱ्यांची गटबाजी आणि सुसूत्रता समन्वयाचा अभाव दिसत असल्याने येथील संकट टळलेले नाही. पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार किशोर दराडे व नरेंद्र दराडे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्याने उपाययोजनाला चालना मिळाली पण कोपरगाव,मनमाड सारख्या अधिकाऱ्यांची उणीव मात्र प्रत्येक जणाच्या मनात भासत आहे.

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

हीच दक्षता शासकीय आरोग्य यंत्रणेने का घेतली नाही?
मालेगावमध्ये कोरोनाचा कहर असताना ते कुटुंब प्रसूतीसाठी गेले नसते तर कदाचित अजूनही येवल्याचा आकडा शून्य असता. एवढे सगळे होऊनही आरोग्य विभागानेही काळजी न घेतल्याने संख्या १४ ने वाढली आहे.पहिली बाधीत महिला एका खासगी हॉस्पिटलमधून ग्रामीण रुग्णालयात गेली होती. या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुरेपूर दक्षता घेऊन वेळीच आरोग्य यंत्रणेला सावध केल्याने व काळजी घेतल्याने या हॉस्पिटलचे इतर रुग्ण व सर्व कर्मचारी सुरक्षित राहिल्याने त्यांना दाद द्यावीच लागेल. मात्र हीच दक्षता शासकीय आरोग्य यंत्रणेने का घेतली नाही याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.
शिवाय,अजूनही आरोग्य विभागातच एकसूत्रता नसल्याने पुढचे संकट कोणी सांगू शकत नाही.प्रशासनाच्या या चुका असल्या तरी येवलेकर देखील तितकेच दोषी आहेत. आजही ते स्वतःच्या धुंदीतून बाहेर पडलेले नसल्याने पुढे धोका होणार हेही डोळ्यापुढे चित्र आहे.

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'