भयानक! मेहुणीकडे शरीरसुखाची मागणी...वरून जातिवाचक शिवीगाळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

बहिणीने फिरोज शेख याच्याशी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला. मात्र संशयित दारूच्या नशेत पीडितेच्या बहिणीशी भांडण करतो. त्यावरून पीडिता संशयिताला समजावून सांगत असल्याने त्याला राग येतो. 2 तारखेला पीडिता घरात एकटी असताना संशयित घरात घुसला अन्...

नाशिक : मेहुणीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या संशयिताने जातिवाचक शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित फिरोज शेख याच्यासह युसूफ शेख, जावेद शेख, गुड्डी शेख, मुसा शेख, हीना शेख (सर्व रा. वडाळागाव) यांच्याविरोधात इंदिरानगर पोलिसांत विनयभंगासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

असा घडला प्रकार

पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिच्या बहिणीने संशयित फिरोज शेख याच्याशी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला. मात्र संशयित दारूच्या नशेत पीडितेच्या बहिणीशी भांडण करतो. त्यावरून पीडिता संशयिताला समजावून सांगत असल्याने त्याला राग येतो. 2 तारखेला पीडिता घरात एकटी असताना संशयित घरात घुसला आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने नकार दिला असता, संशयिताने तिच्याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध केल्याने संशयिताने जातिवाचक शिवीगाळ करीत तिला ठार करण्याची धमकी दिली. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट म्हणजे..

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट हा भारताच्या संसदेने १९८९मध्ये पारित केलेला कायदा आहे. हा कायदा अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचारास प्रतिबंध करतो. पुढील कृत्ये या कायद्याने गुन्हा ठरविली गेली आहेत.

अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीला योग्य वा अयोग्य पदार्थ खाण्याची व पिण्याची सक्ती करणे., जातीय भावनेतून शारीरिक इजा करणे, त्रास देणे, अपमान करणे.नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा करणे.जमिनीचा गैरप्रकारे उपभोग घेणे.स्वतच्या मालकीच्या जमीन व पाणीवापरात अडथळा निर्माण करणे.वेठबिगारी करण्यास सक्ती करणे.धाक दाखवून मतदान करण्यास भाग पाडणे.अनुसूचित जाती व जमातींच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे.लोकसेवकास खोटी माहिती पुरविणे.सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे.प्रार्थनास्थळे, नदी, विहिरी, पाणवठे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे.प्रार्थनास्थळास अथवा घरास आग लावणे.पिण्याचे पाणी दूषित किंवा घाण करणे.महिलांचा विनयभंग करणे.महिलांचा लैंगिक छळ करणे.घर किंवा गाव सोडून जाण्यास भाग पाडणे.खोटी साक्ष वा पुरावा देणे.पुरावा नाहीसा करणे.लोकसेवकाने कोणताही अपराध करणे.

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman woman molestation with atrocity crime case Nashik Marathi Crime News