पावसाळ्यातही पाण्याची वणवणच! भरधाव वाहन चुकवत महिलांची पाण्यासाठी पायपीट

पोपट गंवादे
Saturday, 19 September 2020

दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा दुहेरी संकटात महिलांचा त्रास वाढत आहे. गावातील महिलांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरू होत नसल्याने महिलांना पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवरून जाऊन पायपीट करावी लागत आहे. 

नाशिक : (इगतपुरी) घोटी-सिन्नर महामार्गावर देवळे गावात चार महिन्यांपासून नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने महिलांना भरपावसात महामार्ग ओलांडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा नाहीच

पावसात येथील महिलांना थेट हातपंप व नदीपात्रातून पाणी आणावे लागते. महामार्ग ओलांडून विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागते. अतिशय धोकादायक स्थितीत पाण्यासाठी पायपीट महिलांना जीवघेणी ठरू शकते, भरधाव वाहने चुकवीत डोक्यावर हंडे घेऊन करावी लागणारी पायपीट जीवघेणी ठरू शकते, अशी या गावातील महिलांची स्थिती आहे. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीपुरवठ्याबाबत ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विचारता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. गावात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा दुहेरी संकटात महिलांचा त्रास वाढत आहे. गावातील महिलांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरू होत नसल्याने महिलांना पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवरून जाऊन पायपीट करावी लागत आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

पाणीटंचाईच्या तक्रारीमुळे हैराण महिला आक्रमक 

पाणीटंचाईच्या तक्रारीमुळे हैराण महिला आक्रमक झाल्या असून, शुक्रवारी (ता. १८) गावातील भारती तोकडे, पद्मा तोकडे, नंदाबाई तोकडे, रंजना तोकडे, गोदाबाई तोकडे, ताराबाई तोकडे, चंद्रभागा तोकडे, पूजा तोकडे, सुंदरा दालभगत, अंजना तोकडे, कुंदाबाई दालभगत, शेवंताबाई तोकडे, नंदाबाई गटकळ, संगीता तोकडे, हौसाबाई आडोळे, गीता तोकडे, रेश्मा दालभगत, बेबीताई तोकडे, गोदावरी केणे, मीराबाई माळी, हिराताई केणे, भारती तोकडे आदींसह अनेक महिलांनी ग्रामपंचायतीविरोधात शुक्रवारी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women in Igatpuri are suffering due to water scarcity nashik marathi news