बचत गटातील महिलांना मिळणार पैठणी विणकामाचे प्रशिक्षण 

बापूसाहेब वाघ 
Tuesday, 6 October 2020

जळगाव नेऊर पैठणी हबमधील संस्कृती हॅन्डलूम व संस्कृती पैठणी दालनास मंगळवारी (ता. ६)लिना बनसोड मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी भेट दिली.

नाशिक/मुखेड : महिलांंना सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना, प्रशिक्षण, कृती शिबिरे आयोजित केले जातात. त्याच धर्तीवर शासनाच्या माध्यमातून जळगाव नेऊर (ता. येवला) येथे असलेल्या पैठणी हबमध्ये बचतगटातील महिलांना पैठणी विणकामाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था प्रशासकीय पातळीवर करण्याचे नियोजन होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले. 

जळगाव नेऊर पैठणी हबमधील संस्कृती हॅन्डलूम व संस्कृती पैठणी दालनास मंगळवारी (ता. ६)लिना बनसोड मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी भेट दिली. या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी अन्सार शेख, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, संस्कृती हॅन्डलूम व संस्कृती पैठणीचे संचालक गोविंद तांबे, सोमनाथ तांबे, बचतगटाच्या पूजा त्रिभुवन, दीपाली सोनवणे, योगिता वाघ, गणेश तांबे, सागर कुऱ्हाडे, सचिन ठोंबरे, रावसाहेब ठोंबरे, नितीन चव्हाणके, नितीन वाघ, तुषार गायके, सचिन वाघ, राहुल तांबे, विकास वाघ, संतोष वाघ, भाऊसाहेब शिंदे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

या वेळी बनसोड यांनी हातमागावर पैठणी कशी तयार होते, याची सविस्तर माहिती जाणून घेत उपस्थित बचतगटातील महिलांना पैठणी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. जळगाव नेऊर येथील तरुणांनी स्वतः पैठणी विणकामाचे यशस्वी प्रशिक्षण अवगत करून आकर्षक पैठणीनिर्मितीचे तंत्र अवगत करून शेती व्यवसायाला जोड देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आता महिलावर्ग पैठणीचे प्रशिक्षण घेणार असल्याने महिलावर्ग सक्षमीकरणाच्या दिशेने आगेकूच करणार आहे. 

जळगाव नेऊर येथे बचतगटांतील महिलांसाठी पैठणी विणकाम प्रशिक्षणाची व्यवस्था कशी करता येईल, याची चाचपणी सुरू आहे. महिला पैठणी कारागीर का कमी आहेत? महिलांचे प्रश्न काय आहे? हे समजून घेत आहोत. तसेच सर्व अडचणी जाणून घेतल्या जातील. 
-लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

बचतगटाच्या महिलांना पैठणी विणकाम प्रशिक्षणामुळे हक्काचा रोजगार उपलब्ध होणार असल्याने पैठणी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या सर्व महिलांना संस्कृती हॅन्डलूम व संस्कृती पैठणीतर्फे हवे ते सहकार्य व मार्गदर्शन केले जाईल. 
-गोविंद तांबे, संचालक संस्कृती पैठणी हॅन्डलूम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women will get training in paithani weaving nashik news