esakal | "अब तो कफन का सामान भी बदल गया' मालेगावच्या हतबल बुजुर्गाची ह्रदय पिळवटून टाकणारी व्यथा
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon kabristan.jpg

याबाबत शहरातील जाणकार व येथील सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक युनूस इसा यांनी शायराना अंदाजमध्ये नदीम शाद यांचा, "शोर कब तक मचाएगा आख़िर..चढता दरिया उतरही जायेगा थोडी हिम्मत रखो, बूरा ही सही वक्त ये भी गुजरही जायेगा...' हा शेर ऐकवला. 

"अब तो कफन का सामान भी बदल गया' मालेगावच्या हतबल बुजुर्गाची ह्रदय पिळवटून टाकणारी व्यथा

sakal_logo
By
प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : शहरातील मृत्यूचे वाढते प्रमाण व लॉकडाउनमुळे कफनसाठी लागणाऱ्या साहित्यातही आता बदल होत असून, ऐनवेळी उपलब्ध होणाऱ्या साहित्यावरच समाधान मानत, दफनविधी पार पाडावे लागत आहेत. त्यामुळे शहरातील बुजुर्ग मंडळी "कफन का सामान भी बदल गया हैं' अशा प्रतिक्रियांसोबतच प्रचंड अस्वस्थता आणि हतबलता व्यक्त करीत आहेत. 
शहरात कोरोनाचे अक्षरश: थैमान सुरू असून, आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला. संसर्गाचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, अन्य विकार व उपचार न मिळाल्याने आतापर्यंत सहाशेपेक्षा अधिक ज्येष्ठांनी प्राण गमावले. त्यामुळे शहरात लोकांना मार्गदर्शन करायला तरी ज्येष्ठ नागरिक राहतील का, अशी शंका व्यक्त करीत, "सांगा कसं जगायचं, कसं वागायचं' असा सवाल वयोवृद्ध नागरिक करत आहेत. दुसरीकडे अनेकांनी त्यांना धीर देण्याचे कामदेखील सुरू केले आहे. 

साहित्य मिळेना 
लॉकडाउनमुळे शहरात सध्या दफनविधीसाठी लागणारे लाकडी फळी (बरगा), बांबू चटई, टेरिकॉट कापड आदी साहित्य मिळेनासे झाल्याचे हिलाल कफन सेंटरचे मोहंमद फकरुद्दीन यांनी "सकाळ'ला सांगितले. त्यामुळे बांबू चटईऐवजी प्लॅस्टिक, टेरिकॉटच्या सफेद कापडाऐवजी यंत्रमागावरील स्थानिक ग्रे, पिवळसर कापड वापरले जात आहे. बरगा कमी पडत असल्याने काही वखारी सुरू करण्यास संमती द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

मृत्यूचे प्रमाण वाढले 
शहरात गेल्या चार दिवसांत ऐंशीपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची नोंद कब्रस्तानात आहे. 2019 च्या एप्रिलमध्ये बडा कब्रस्तानात फक्त 140 दफनविधी झाले होते, तर यंदा 28 एप्रिलपर्यंतच हा आकडा 459 वर पोचला आहे. मृतांच्या संख्येत झालेली तिप्पट वाढ चिंताजनक आहे. यात 85 टक्के वृद्धांचा समावेश आहे. याबाबत शहरातील जाणकार व येथील सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक युनूस इसा म्हणाले, की माझ्या मुलांना म्हणजेच, स्थायी समितीचे सभापती डॉ. खालीद परवेज, नगरसेवक मालिक व माजीद यांना विविध भागातील ज्येष्ठांच्या कुटुंबीयांचे मदत व उपचारासाठी दूरध्वनी आले. काहींना सहकार्य करू शकलो. खासगी रुग्णालये बंद असल्याने अनेकांनी प्राण गमावले. उपचार मिळाले असते, तर यातील काही वाचू शकले असते. तरीदेखील ज्येष्ठांनी संयम बाळगावा. घाबरू नये, असा धीर देताना त्यांनी

शायराना अंदाजमध्ये नदीम शाद यांचा, 
"शोर कब तक मचाएगा आख़िर.. 
चढता दरिया उतरही जायेगा 
थोडी हिम्मत रखो, बूरा ही सही 
वक्त ये भी गुजरही जायेगा...' 
हा शेर ऐकवला. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त

बडा कब्रस्तानातील तुलनात्मक मृत्यू 
2019 
जानेवारी : 192 
फेब्रुवारी : 172 
मार्च : 201 
एप्रिल : 140 
 
एकूण ः 705 

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

2020 
जानेवारी : 148 
फेब्रुवारी : 166 
मार्च : 205 
एप्रिल : 459 

एकूण ः 987