जेव्हा कोरोनाबाधिताच्या पत्त्यामुळे चुकतो नागरिकांच्या काळजाचा ठोका...तेव्हा....

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 मे 2020

शासकीय यंत्रणेमार्फत कोरोना रुग्णासंदर्भात प्रसिद्ध केल्या जाणार्‍या यादीत तालुक्याचा उल्लेख असतो. त्यामुळे या वृत्ताने तालुक्यात खळबळ उडते. अनेकदा रुग्ण त्या ठिकाणी वास्तव्यास नसतो. परंतु, मूळ पत्ता म्हणून गावाचे, तालुक्याचे नाव पुढे येताच अनेकांची झोप उडते. असाच काहीसा प्रकार नांदगाव तालुकावासियांनी अनुभवला.

नाशिक : शासकीय यंत्रणेमार्फत कोरोना रुग्णासंदर्भात प्रसिद्ध केल्या जाणार्‍या यादीत तालुक्याचा उल्लेख असतो. त्यामुळे या वृत्ताने तालुक्यात खळबळ उडते. अनेकदा रुग्ण त्या ठिकाणी वास्तव्यास नसतो. परंतु, मूळ पत्ता म्हणून गावाचे, तालुक्याचे नाव पुढे येताच अनेकांची झोप उडते. असाच काहीसा प्रकार नांदगाव तालुकावासियांनी अनुभवला.

ती बातमी वाऱ्यासारखी पसरली...अन् ठरला चर्चेचा विषय

नांदगाव तालुक्यात पोखरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरताच तो चर्चेचा अन् भीतीचा विषय झाला. प्रत्यक्षात संबंधित रुग्ण हा मूळ पोखरी येथील रहिवासी असला तरी अनेक वर्षे तो ठाणे येथे वास्तव्यास आहे. अनेक महिन्यांपासून तो मूळ गावी (पोखरी) गेलेला नाही, असे समजते. मात्र, या रुग्णासंदर्भात पुढे आलेल्या माहितीत तो पोखरीचा रहिवासी असल्याचा उल्लेख आल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होऊन धास्ती निर्माण झाली होती. त्यामुळे पूर्ण माहितीच्या आधारे कोरोना रुग्णांबाबत अफवा पसरवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये विनाकारण दहशत निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. 

वर्तमान ठिकाणाचा उल्लेख प्रथम करावा -  नागरिकांकडून मागणी
वास्तविक ही व्यक्ती ठाणे येथून चांदवड येथे आल्यानंतर तेथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी घेण्यात आलेला स्वॅब आता पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय यंत्रणेमार्फत कोरोना रुग्णासंदर्भात प्रसिद्ध केल्या जाणार्‍या यादीत तालुक्याचा उल्लेख असतो. त्यामुळे या वृत्ताने तालुक्यात खळबळ उडते. अनेकदा रुग्ण त्या ठिकाणी वास्तव्यास नसतो. परंतु, मूळ पत्ता म्हणून गावाचे, तालुक्याचे नाव पुढे येताच अनेकांची झोप उडते. असाच काहीसा प्रकार नांदगाव तालुकावासियांनी अनुभवला. त्यामुळे शासकीय यंत्रणांनीही कोरोनाबाधितांची माहिती प्रसिद्ध करताना त्यांच्या वर्तमान ठिकाणाचा उल्लेख प्रथम करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 

कॅनडा कॉर्नर परिसरात वृध्दा तिथली नव्हतीच...
दरम्यान, गेल्या महिन्यात नाशिक शहरातही कॅनडा कॉर्नर परिसरात वृध्दा पॉझिटिव्ह आढळ्याची बाब प्रशासनाने जाहीर केली होती., परंतु प्रत्यक्षात या रुग्णाचा मुलगा तेथे वास्तवास होता आणि संबंधित वृध्दा माणकेशा नगर येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले होते. यामुळे माणकेशा नगर परिसर साल करण्यात आला होता. मात्र सायंकाळी उशीरा प्रशासनाने कॅनडा कॉर्नर येथील महिला बाधित आढळल्याची माहिती दिल्याने रात्रभर या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते तसेच परिसर सील करण्याबाबतही तर्क-वितर्क लढवले जात होते. यामुळे कोरोना रुग्णाचे वर्तमान ठिकाण उल्लेखित असल्यास नागरिकांचा संभ्रम टळू शकेल अशा प्रतिक्रियाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wrong address of corona patients nashik marathi news