मुक्‍त विद्यापीठ देतंय विविध क्षेत्रांतील अकरा ऑनलाइन प्रोग्राम...कसे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रांतील 11 ऑनलाइन प्रोग्राम सुरू करण्यात येत आहेत. या कौशल्या धिष्ठित शिक्षणक्रमाला जूनपासून सुरवात होणार असून, घरी बसून अध्ययन करण्याची सुविधा त्याद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रांतील 11 ऑनलाइन प्रोग्राम सुरू करण्यात येत आहेत. या कौशल्या धिष्ठित शिक्षणक्रमाला जूनपासून सुरवात होणार असून, घरी बसून अध्ययन करण्याची सुविधा त्याद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

घरबसल्या कौशल्य प्राप्तीची संधी

लॉकडाउनमुळे ऑनलाइन अध्ययनाकडे सर्वच स्तरांवरून ओढा वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत मुंबईच्या स्किलमेट ऍकॅडमीशी सामंजस्य करार झाला आहे. मुक्‍त विद्यापीठ व स्किलमेट ऍकॅडमी यांच्यातर्फे विविध 15 विषयांवर ऑनलाइन प्रोग्राम उपलब्ध केला जाणार आहे. तीन महिने कालावधीच्या या शिक्षणक्रमात सर्व अभ्याससामग्री ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार असल्याने घरबसल्या कौशल्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

कोर्सेससाठी नोंदणी प्रक्रिया

दरम्यान, सीसीएसआयच्या सल्लागार समितीची बैठक एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात झूम ऍपद्वारे झाली होती. यात या विविध 11 विषयांना मंजुरी देण्यात आली होती. यानंतर मुक्‍त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी ऍकॅडमिक कौन्सिलचे प्रमुख म्हणून या शिक्षणक्रमांना मान्यता दिलेली आहे. अध्ययन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशितांची ऑनलाइन परीक्षा घेऊन उत्तीर्णांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जूनपासून विद्यापीठाच्या माध्यमातून या कोर्सेससाठी नोंदणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

असे आहेत अभ्यासक्रम 

डिझाइन थिंकिंग, मॅनेजरियल कम्युनिकेशन, प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्‍टिव्ह मॅनेजर, सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग ऍन्ड वेब ऍनालिसिस, फायनान्स फॉर नॉन फायनान्स, इंग्लिश फॉर करिअर डेव्हलपमेंट, ई-कॉमर्स, इंटरप्रेनरशिप, आर्टिफिशल इंटेलिजन्स, डिजिटल बॅंकिंग. 

हेही वाचा > चार वर्षांनंतर 'तो' रस्ता चकाकला...पण, श्रेय कुणाचे? राजकारण तापण्याची शक्‍यता

सध्याच्या परिस्थितीत नियमित शिक्षणासोबत अतिरिक्‍त कौशल्ये आत्मसात करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मुक्‍त विद्यापीठातर्फे ऑनलाइन प्रोग्राम सुरू केले जात आहेत. राज्यभरातून त्यास चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास असून, तीन महिन्यांचे हे ऑनलाइन प्रशिक्षण उमेदवारांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवेल. - प्रा. ई. वायुनंदन, कुलगुरू, मुक्‍त विद्यापीठ  

हेही वाचा > सिनेस्टाईलने केला 'असा' प्रताप...नंतर रंगला पाठलागाचा थरार...अन् समोरच्या वाहनावर जेव्हा धडकले..तेव्हा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashwantrao Chavan Maharashtra Open University is launching 11 online programs in various fields nashik marathi news