यंदा ना मिरवणूक, ना गुलाल उधळण, मालेगावात भाविकांच्या उत्साहावर विरजन! हे आहे कारण

प्रमोद सावंत
Friday, 28 August 2020

महापालिकेने विसर्जनाची गर्दी टाळण्यासाठी महादेव घाट व कॅम्प या कायमस्वरुपी गणेश कुंडांसह 11 तात्पुरत्या स्वरुपात कृत्रिम गणेशकुंडांची निर्मिती केली. 

नाशिक/मालेगाव : कोरोना संसर्गामुळे शहर व तालुक्यात यंदा गणेश विसर्जनाची धामधूम नसेल. विसर्जन साध्या पध्दतीने होईल. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी आहे. विसर्जन व ताजिया मिरवणुकीसाठी संचारबंदीत कुठलीही सूट नसून मिरवणुकींना बंदी आहे. सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणपती मनपाने विभागनिहाय केलेल्या तात्पुरत्या गणेशकुंडामध्ये वेळेत गणेश विसर्जन करावे असे आवाहन अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांनी केले.

ताजिया ताबुतांच्या मिरवणुका नसतील

पोलिस नियंत्रण कक्ष आवारात गुरुवारी (ता.27) गणेश मंडळ व ताजिया कमिटी सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. श्री. घुगे यांनी शासनाचे आदेश नियमांची माहिती दिली. महापालिका अधिकाऱ्यांना स्वच्छतेविषयी सुचना देतानाच मिरवणुकांना बंदी असल्याचे स्पष्ट केले. सहाय्यक आयुक्त तुषार आहेर यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या वेळी तहसिलदार चंद्रजीत राजपूत, उपअधिक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. मोहरम निमित्त ताजिया ताबुतांच्या मिरवणुका नसतील. सुमारे साडेपाचशे ऐवजी अडीचशे ताजिया शहरात स्थापन होतील. साधेपणाने मोहरम साजरा करु असे ताजिया समितीचे शफिक राणा यांनी सांगितले. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रमोद शुक्ला यांनी केले. बैठकीस रामा मिस्तरी, केवळ हिरे, कैलास तिसगे, जगदीश गोऱ्हे, जाहीद अन्वर, मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल देवरे, गणेश मंडळांचे व ताजिया समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्क

महापालिकेने विसर्जनाची गर्दी टाळण्यासाठी महादेव घाट व कॅम्प या कायमस्वरुपी गणेश कुंडांसह 11 तात्पुरत्या स्वरुपात कृत्रिम गणेशकुंडांची निर्मिती केली. कायमस्वरुपी दोन गणेशकुंडांवर नियंत्रण अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 55 जणांची नियुक्ती केली आहे. तात्पुरत्या गणेशकुंडांवर सात ते दहा अधिकारी, कर्मचारी नियुक्त असून त्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. यात नियंत्रण अधिकारी, अग्निशामक कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, कामगार, सफाई कामगार आदींचा समावेश आहे.
- ञ्यंबक कासार, आयुक्त, मालेगाव मनपा

शहरातील कायमस्वरुपी गणेशकुंडांसह तात्पुरत्या स्वरुपात साकारलेल्या गणेशकुंडांची ठिकाणे अशी :
कॅम्प गणेश कुंड, महादेव घाट गणेशकुंड, वाल्मिकनगर शाळा, साेयगाव फायर स्टेशन, अंबिका कॉलनी-अंबिका मंदिर, गोळीबार मैदान, संभाजी नगर-नामपूर रोड, पुष्पाताई हिरे नगर-भायगाव, भायगाव गावठाण-नदी किनार, कलेक्टर पट्टा- महारुद्र हनुमान मंदिर, द्याने फरशी पुल, शिवाजी जिमखाना, टेहेरे चौफुली-गिरणा नदी.

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this year there are no processions in malegaoan nashik marathi news