देवदर्शनास गेलेल्या तरुणाला धबधब्याचे आकर्षण पडले महागात...मित्रांसोबत ठरली शेवटची पिकनिक

kishor vaijapur.jpg
kishor vaijapur.jpg

नाशिक / नांदगाव : कासारी घाटात चांदेश्वरीचा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. विशेषतः श्रावणात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. चार सहकाऱ्यांसह शनिवारी देवस्थान दर्शनासाठी किशोरही गेलेला होता. पण त्या ठिकाणी असलेल्या धबधब्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. पण तिच पिकनिक किशोरची शेवटची ठरली..वाचा काय घडले?

चांदेश्वरी धबधब्याचा मोह पडला महागात

किशोर चार सहकाऱ्यांसह  शनिवारी (ता.१) श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे गेले होते. तेथून ते  या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. किशोर मित्रांसह धबधब्याच्या खालील भागात पोहण्यासाठी उतरले. मात्र किशोरला पाण्याचा अंदाज आला नाही, तर दुसऱ्या एकाला वाचविण्यात यश आले. किशोरचा मात्र मृत्यू झाला. धबधब्याजवळ खोलगट भागात अडगळीत अडकलेला किशोरचा मृतदेह रविवारी (ता.२) दुपारी दीडच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. त्यासाठी चांदोरी (ता. निफाड) येथील रेसेक्यू पथकाची मदत घेण्यात आली.

गावात हळहळ

किशोर बारगळ यांच्यामागे पत्नी व साडेतीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. वैजापूर तालुक्यातील पोखरी गावात मंडप व्यावसायिक असलेल्या बारगळ यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तालुक्यातील कासारी  घाटाजवळील चांदेश्वरी धबधब्याजवळच्या डोहात पोहण्यासाठी  उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. किशोर दादासाहेब  बारगळ  (वय ३०) असे मृताचे  नाव असून, तो वैजापूर तालुक्यातील पोखरी  येथील रहिवासी आहे. 

रिपोर्ट - संजीव निकम

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com