आईसोबत झालेल्या वादातून मुलीने सोडले घर; अखेर तीन दिवसांनी झाला खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

आईसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर ती सायकल घेऊन घराबाहेर पडली. तीन दिवस कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. ती सापडलीदेखील मात्र, आधारतीर्थ आश्रमात. तिला समज देऊन घरी आणले. दु:खाचा शेवट सुखात झाला खरा पण एक अल्पवयीन मुलगी आश्रमात तीन दिवस राहते...

नाशिक : आईसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर ती सायकल घेऊन घराबाहेर पडली. तीन दिवस कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. ती सापडलीदेखील मात्र, आधारतीर्थ आश्रमात. तिला समज देऊन घरी आणले. दु:खाचा शेवट सुखात झाला खरा पण एक अल्पवयीन मुलगी आश्रमात तीन दिवस राहते, तिची माहिती आश्रमातून पोलिसांना लागलीच का कळविली नाही? चर्चेला उधाण. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

श्रमिकनगरमधील १५ वर्षांची युवती आईसोबत भांडण झाल्याने घरातून सायकलवर बाहेर पडली. रागात तिने त्र्यंबकरोडवरील आधारतीर्थ आश्रम गाठले. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला राहण्यासह जेवण उपलब्ध करून दिले. इकडे मुलीच्या घरी मात्र कुटुंबियांचा ह्रदयाचा ठोकाच चुकला. सातपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. तपास सुरू झाला पण तो भांडणावर येऊन थांबला. पोलिसांपाठोपाठ युवतीच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर शनिवारी ही युवती आश्रमात सुखरूप असल्याचे आढळून आले. आश्रमाने काळजी घेतली हे खरे असले तरी याबाबत लागलीच अथवा दुसऱ्या दिवशी सकाळी नजीकच्या पोलिस ठाण्याला माहिती देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

संचालकांनी आपली बाजू स्पष्ट केली...

आश्रमातील अनाथ मुलांची स्थिती पाहून युवतीला घरी परतण्याची इच्छा झाली. मुलीने आश्रमात पाऊल ठेवल्यानंतर चुप्पी साधली होती. तिच्याकडे आणि आश्रमचालकाकडे या प्रकरणी चौकशी केली. पालकांची कोणतीही तक्रार नसल्याचे सातपूर पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी याबाबत आश्रमच्या संचालकांकडे विचारणा सुद्धा केली. युवती रागात होती, तिने काही बरेवाईट केले असते तर जबाबदारी कोणी घेतली असती, असा प्रश्न उपस्थित करीत संचालकांनी आपली बाजू स्पष्ट केली. तसेच युवतीकडे सातत्याने चौकशी सुरू होती. ती काहीच बोलण्याच्या मानसिकतेत नसल्याने पोलिसांना कळवायचे काय, असा प्रश्नही संचालकांनी उपस्थित केला.

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young woman who left the house in anger was found three days later nashik marathi news