
शिरपूर : शहर पोलिस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांच्या हाती आंतरराज्यीय चोरटे हाती आले. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १४ दुचाकी हस्तगत करण्यात यश आले असून चार गुन्हे उघड झाले आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत सहा लाख ८० हजार रुपये आहे.
शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर उभी होंडा लिओ दुचाकी (एमपी ४६, एमपी १११२) २५ डिसेंबरला सायंकाळी साडेसातला अज्ञात संशयितांनी चोरली होती. विशेष म्हणजे हँडल लॉक असताना ही चोरी झाली होती.
दुचाकी मालक पवन मोरे याने शहर पोलिसात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना निरीक्षक ए. एस. आगरकर यांना चोरीतला संशयित शिरपूर फाट्यावर आमोदे गावाच्या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. (14 bikes seized from Madhya Pradesh thieves Dhule News)
त्यांनी शोध पथकाला आदेश दिले. पथकाने संशयित अरबाज शाह अफजल शाह (वय २४, रा.औरंगपुरा ता. रहिमपुरा जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर संशयिताने चोरीची कबुली देऊन या गुन्ह्यात साथीदार शाहीद शाह शब्बीर शाह याचा समावेश असल्याची माहिती दिली.
औरंगपुऱ्यात गोदाम
शोध पथकाने मध्य प्रदेशात जाऊन संशयित शाहीद शाह (वय १९) याला अटक केली. त्याने दुचाकी ठेवलेली जागा दाखवली. संशयित अरबाज शाहच्या औरंगपुऱ्यातील घरासमोर दुचाकींचे जणू गोदामच होते. एक एक करीत पोलिसांनी एकूण १४ दुचाकी ताब्यात घेतल्या. त्यात होंडा, पॅशन प्रो, बजाज पल्सर, शाईन, डीलक्स आदींचा समावेश आहे.
संशयितांनी शिरपूर, खरगोन, पानसेमल, कुकशी आदी ठिकाणाहून चोरलेल्या दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी दुचाकींचा शोध लागण्याची शक्यता आहे. संशयितांनी बनावट नंबर प्लेट नंबर लावलेल्या असल्यामुळे दुचाकीचा चेसीस व इंजिन नंबरच्या आधारावर मूळ मालकांचा शोध सुरु आहे.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.एस.आगरकर, शोध पथकाचे उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, गृहरक्षक दलाचे नाना अहिरे, मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी आदींनी ही कामगिरी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.