sugarcane
sugarcane esakal

Nandurbar Agriculture News : आयान मल्टीट्रेड कारखान्यातर्फे 2600 रूपये दर जाहीर

Published on

Nandurbar Agriculture News : येथील आयान मल्टीट्रेड कारखान्यातर्फे २०२३-२४ चा चालू गाळप हंगामासाठी ऊस दराचा पहिला हप्ता २ हजार ६०० रूपये प्रमाणे दर जाहीर केला असल्याची माहिती संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.(2600 rupees announced by Ayan Multitrade factory for sugarcane nandurbar agriculture news )

श्री. सिनगारे म्हणाले की, २४ गटातून १५ हजार ०८७ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद कारखान्याकडे झालेली असून १२ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्टे आहे. या भागात पावसाची सरासरी कमी असल्याने ऊसाच्या वजनामध्ये घट होण्याची दाट शक्यता आहे.

परिणामी गाळपाचे दिवस कमी होतील. त्यामुळे यावर्षी साखर उतारा देखील कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच कारखान्याने गाळप क्षमता वाढविल्यामुळे आर्थिक बोजा असताना देखील तोटा सहन करत समोर ठाकलेल्या दुष्काळा अभावी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून कारखान्याने पहिला हप्ता २ हजार ६०० रूपये प्रमाणे जाहीर केला आहे.

sugarcane
Nandurbar Agriculture News : तालुक्यातील पहिलेच कापूस खरेदी केंद्र; शहाद्यात सोमवारपासून कापूस मंडी

यावर्षी देखील उच्चांकी, सरसकट व वेळेत ऊस दराची परंपरा कायम राखत जाहीर केलेला दर हा शेतकऱ्यांना परवडणारा ऊस दर जाहीर केला आहे.

पुढच्या काळात चांगला उतारा व अपेक्षीत ऊस दर मिळण्यासाठी उसाच्या प्रकारात बदल केला असून लागवडीसाठी लागणारे चांगल्या प्रतीचे ऊस बियाणे, शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. पारदर्शक व योग्य व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांची विश्वासार्हता कायम ठेवली आहे.

sugarcane
Nandurbar Agriculture News : तळोदा परिसरात सोयाबीन काढणीस सुरवात; उत्पादनात मोठी घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com