Dhule News : जागतिक दिव्यांग दिनाच्या स्पर्धेत 500 दिव्यांग सहभागी! 28 क्रीडाप्रकारात नैपुण्य

स्पर्धेचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.
Dharti Deore, present at the sports competition for the disabled in the district sports complex.
Dharti Deore, present at the sports competition for the disabled in the district sports complex.esakal

Dhule News : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण मंत्रालय, दिव्यांग कल्याण आयुक्तालय अधीनस्त जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायमस्वरूपी विनाअनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा व गतिमंद बालगृहामधील दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडासंकुलात झाल्या. यात पाचशे स्पर्धक सहभागी झाले.

स्पर्धेचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. (500 people with disabilities participate in World Disability Day competition dhule news)

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती कैलास पावरा.

जिल्हा परिषद सदस्य बादल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनीष पवार यांनी सांगितले.

Dharti Deore, present at the sports competition for the disabled in the district sports complex.
Dhule News : धुळ्यात डे केअर सेंटरला मान्यता; हिमोफिलिया रुग्णांना दिलासा

जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेसाठी जिल्ह्यातील २२ अनुदानित, विनाअनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा व अनाथ गतिमंद बालगृहातील ५०० विद्यार्थी उपस्थित होते.

पैकी २२६ स्पर्धक वयोगटानुसार व दिव्यांगाच्या प्रकारानुसार विविध २८ प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण झाले. संबंधित शाळेचे दीडशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Dharti Deore, present at the sports competition for the disabled in the district sports complex.
Dhule Municipality News : धुळ्यात 4 दुकाने सील; मनपाच्या जप्ती पथकाची करवसुलीप्रश्‍नी कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com