Dhule News : शिरपूर तालुक्यासाठी 55 कोटी मंजूर; आमदार पटेल, पावरा यांचा पाठपुरावा

55 crore sanctioned for Shirpur taluka due to MLA Patel Pawara follow up dhule news
55 crore sanctioned for Shirpur taluka due to MLA Patel Pawara follow up dhule newsesakal

Dhule News : शिरपूर तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी ५५ कोटी ३४ लाखांच्या निधीस पाठपुराव्याअंती मंजुरी मिळाल्याची माहिती आमदा अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांनी दिली.

शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम, आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील विविध रस्ते व पुलांसाठी निधी मंजूर झाला. (55 crore sanctioned for Shirpur taluka due to MLA Patel Pawara follow up dhule news)

त्यातून होणारी कामे अशी : बिगर आदिवासी क्षेत्र (राज्य महामार्ग) : पळासनेर, हाडाखेड, दहिवद, नरडाणा रोड रुंदीकरण- २ कोटी ४० लाख रुपये, थाळनेर-भाटपुरा- नागेश्वर रोड दुरुस्तीसाठी- २ कोटी ५० लाख, पळासनेर, हाडाखेड, दहिवद, नरडाणा रोड दुरुस्ती- १ कोटी, थाळनेर- भाटपुरा-नागेश्वर रोड काँक्रिटीकरण- २ कोटी, एकूण- ७ कोटी ९० लाख.

जिल्हा रस्ते : एसएच ४ ते अजनाड- जापोरे- २ कोटी, होळ ते बभळाज सुधारणा- ३ कोटी, एसएच ४ ते अहिल्यापूर- वाठोडे- जैतपूर-कुरखळी- सावळदे सुधारणा- २ कोटी, होळनांथे- मांजरोद ते जिल्हा बॉर्डर- १ कोटी १० लाख, सावळदे- उंटावद रोडवर अरुणावती नदीवर पूल बांधकाम- ११ कोटी, एसएच- १ ते बुडकी- चांदसूर्या- वासर्डी- बलकुवा- अर्थे, एसएच-४, भरवाडे- टेंभे रोड, एमडीआरपर्यंत सुधारणा- १ कोटी ७५ लाख, गुऱ्हाळपाणी- बोराडी- निमझरी- शिरपूर ते एसएच ४ रोड, एमडीआरपर्यंत सुधारणा- १ कोटी २५ लाख, एकूण जिल्हा रस्त्यासाठी २२ कोटी १० लाख.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

55 crore sanctioned for Shirpur taluka due to MLA Patel Pawara follow up dhule news
Dhule News : धुळे जिल्ह्यात नदी-नाले अद्यापही कोरडेच

आदिवासी भागासाठी मंजूर रस्ते कामे : हिसाळे- महादेव रोड- मलखाननगर - ४ कोटी ५० लाख, सुळे ते नटवाडा - १ कोटी, हिसाळे एमडीआर- ९ ते अनेर डॅम- मलखान नगर रोड संरक्षण भिंतीसह - ९० लाख, गुऱ्हाळपाणी- बोराडी- निमझरी- शिरपूर रोड - १ कोटी ३० लाख, बुडकी- चांदसूर्या- नांदर्ड- चांदसे- अर्थे रोड- १ कोटी ५० लाख, जळोद- तराड कसबे- भटाणे- जवखेडा- अंतुर्ली रोडवर पूल- १ कोटी ५० लाख, बोरपाणी- फत्तेपूर- मुखेड रोड- १ कोटी २५ लाख, बुडकी- चांदसूर्या- नांदर्डे- चांदसे- अर्थे रोड- १ कोटी ५० लाख, जळोद- तऱ्हाडकसबे- भटाणे- जवखेडा- अंतुर्ली रोड- १ कोटी ५० लाख, हातेडजवळ रस्ता दुरुस्ती व पूल- २ कोटी रुपये, संरक्षक भिंतीसह जळोद- तराड कसबे- भटाणे- जवखेडा- अंतुर्ली रोड- १ कोटी, एमडीआर ७० ते पारशीपाडा- वरझडी- हिंगोणी- पिंपराडपाडा-वरझडीपर्यंत सुधारणा- ७५ लाख, वरझडी- हिंगोणी- पिंपराडपाडा- हिंगोणीपाडापर्यंत सुधारणा- १ कोटी, एमडीआर ६४ ते अंबडपाडा- १ कोटी, आदिवासी क्षेत्रासाठी एकूण २० कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

नाबार्डकडूनही कामे मंजूर

नाबार्डतर्फे शिरपूर तालुक्यात जातोडे- वाणवा- चांदपुरी- अर्थे रोडवर लहान पुलासाठी २ कोटी ९५ लाख, तसेच अन्य पुलासाठी, बोराडी-न्यू बोराडी- उमरदे- वकवाड रोडसाठी १ कोटी ९३ लाख ६९ हजार, असा एकूण ४ कोटी ८९ लाख ६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यास भरीव निधी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

55 crore sanctioned for Shirpur taluka due to MLA Patel Pawara follow up dhule news
Dhule News : धुळे शहरातील काही भागात या 2 दिवस पाणीपुरवठा होणार उशिरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com