Nandurbar News : कुकलट येथे खैर लाकडासह 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

अक्राणी परिमंडळातील नियतक्षेत्र-राजबर्डी येथील मौजे कुकलट (आयदेवीपाडा) येथे ७४ खैर झाडाचे नग, सागाचा एक नग, मोटारसायकल व कटर मशिन वन विभागाच्या पथकाने जप्त केले.
Khaira wood, motorcycle, cutter machine and forest department staff were seized.
Khaira wood, motorcycle, cutter machine and forest department staff were seized.esakal

सिसा : धडगाव तालुक्यातील अक्राणी परिमंडळातील नियतक्षेत्र-राजबर्डी येथील मौजे कुकलट (आयदेवीपाडा) येथे ७४ खैर झाडाचे नग, सागाचा एक नग, मोटारसायकल व कटर मशिन वन विभागाच्या पथकाने जप्त केले. (68000 worth of goods including Khair wood seized at Kuklat nandurbar news)

कुकलट गावातील आयदेवीपाडा जंगलभागात गुप्त बातमीवरून अक्राणी व बिलगाव परिक्षेत्र कर्मचाऱ्यांसह शनिवारी (ता. २०)

फिरस्ती करीत असताना ताज्या तोडीचे ७४ खैर नग व एक साग नग अंदाजे तसेच सुमारे २० हजार रुपयांची मोटारसायकल व दहा हजार रुपये किमतीचे कटर मशिन असा एकूण ६७ हजार ८८४ रुपयांचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला.

Khaira wood, motorcycle, cutter machine and forest department staff were seized.
Thane Crime: डॉक्टरच्या हत्येची सुपारी देणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

यातील आरोपी वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेत पसार झाले. कारवाईनंतर मुद्देमाल शासकीय वाहनाने धडगाव टिंबर डेपोवर आणून पावतीने जमा केला.

याबाबत राजबर्डीचे वनरक्षक ए. एस. पाडवी यांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई वनक्षेत्रपाल श्रीमती सी. ए. काटे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल धडगाव (अ.का.) बी. एम. परदेशी, वनरक्षक ए. एस. पाडवी, आर. झेड. पावरा, पी. एफ. पाडवी, डी. के. पाडवी.

श्रीमती जे. एम. वळवी, आर. जे. पावरा, एम. एच. तडवी, यू. सी. पावरा, एस. बी. भंडारी, जी. बी. तडवी, वनमजूर शिवाजी पाडवी यांनी केली. वनपाल बी. एम. परदेशी तपास करीत आहेत.

Khaira wood, motorcycle, cutter machine and forest department staff were seized.
Pune Crime : प्रेमसंबंधास विरोध केल्याने मैत्रिणीच्या आईचा गळा आवळून खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com