Dhule News : तहानेने घेतला बैलांचा बळी...! शिरधानेत जनावरांचा बुडून मृत्यू

7 animals drowned in Shirdhane dhule news
7 animals drowned in Shirdhane dhule newsesakal

Dhule News : शिरधाने (ता. धुळे) येथील शेततळ्यात बुडून सात जनावरांचा मृत्यू झाला असून, शेतकरी दिलीप पिंगळे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. नेहमीप्रमाणे पिंगळे आपल्या जनावरांना बैलगाडी व बैलगाडीला बांधलेल्या पाच जनावरांना पाणी पाजायला घेऊन जात होते. (7 animals drowned in Shirdhane dhule news)

मात्र शेततळे जवळ आल्याने व तहानेने व्याकूळ झालेल्या जनावरांना त्यात पाणी दिसल्याने शेततळ्यात ओढून घेतले. बैलजोडीसह दोन दुभत्या गायी, दोन गोऱ्हे, एक वासरी अशा सात जनावरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेततळ्यांत पाणी जास्त असल्याने व गाळ असल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. सुदैवाने शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत बैलगाड्यांतून पटकन उडी मारल्याने ते बचावले.

शेतकरी दिलीप पिंगळे यांचे गावापासून तीन किलोमीटर शेत आहे. गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने शेतात जनावरांना पाण्याची व्यवस्था केली आहे. तेथे जनावरांना रोज नेले जाते. गुरुवारी पाण्यासाठी थोडासा उशीर झाल्याने शेतकरी पिंगळे सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास बैलगाडीसह इतर पाच जनावरांना घेऊन शेताकडे जात होते.

मात्र तीव्र उन्हामुळे सर्व जनावरे तहानलेली होती शेततळे जवळ आल्यावर व त्यात पाणी दिसल्याने बैलगाडीसह जनावरांनी शेततळ्यात ओढून घेतले. पाणी जास्त व गाळ असल्याने सातही जनावरांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

7 animals drowned in Shirdhane dhule news
Dhule News : 25 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; जिल्हाधिकारी शर्मा यांचा आदेश

पट्टीच्या पोहणाऱ्यांनी प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला. सुदैवाने शेतकरी बचावले आहेत. त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. तलाठी आनंदा बोरसे यांनी घटनेचा पंचनामा केला.

"शिरधाने गावासह शेती परिसरात विहिरींची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, कुठूनही पाण्याचे स्रोत नाहीत. जवळच अक्कलपाडा धरण आहे. गावालगत धरणाचा डावा कालवा गेला आहे.

मात्र त्यात पाणी सोडलेले नाही. त्यात उन्हाळ्याचे तिसरे आवर्तन सोडले असते तर ही परिस्थिती शेतकऱ्‍यावर ओढवली नसती. पशुधन शेतकऱ्याची लक्ष्मी असते. आजच त्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनस्तरावरून शेतकऱ्याला मदत व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना आहे." -दादाभाई भदाणे, ग्रामस्थ

7 animals drowned in Shirdhane dhule news
Dhule News : शासन आपल्या दारीअंतर्गत सांगवीत विविध योजनांचा लाभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com