
Dhule News : बोरकुंड-रतनपुरा जिल्हा परिषद गटासह धुळे ग्रामीणमधील ४५ गावांसाठी, महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत सात कोटींच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
बोरकुंडचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली. या कामांच्या मंजुरीकामी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांचे मोठे योगदान आहे.
या मंजूर कामांमुळे धुळे ग्रामीणमधील ४५ गावांचा विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे. (7 crore sanctioned for villages in Dhule taluka news)
खनिज विकास निधीतून धुळे ग्रामीणमधील शाळांची दुरुस्ती, वर्गखोली बांधणे, शाळांकडे जाण्यासाठी रस्ता तयार करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयी-सुविधा आदी कामांसाठी सात कोटीची कामे मंजूर करून आणली. मराठी शाळेंतर्गत दुरुस्तीसाठी तालुक्यातील १५ गावांसाठी प्रत्येकी पाच लाख मंजूर झाले.
सीताणे, वडजाई, खोरदड तांडा, कुंडाणे, बोदगाव, अकलाड, वार, अजनाळे, वणी बुद्रुक, नंदाळे बुद्रुक, दोंदवाड, धाडरे, धाडरी, शिरडाणे व शिरडाने प्र. नेर ही गावे आहेत. जिल्हा परिषद मराठी शाळेत वर्गखोलीसाठी नंदाळे बुद्रुक, अंचाळे, मोरदड, देऊर खुर्द, खोरदड, बेहेड, देऊर बुद्रुक, लोहगड या गावांना प्रत्येकी दहा लाख, तर खंडलाय बुद्रुकसाठी पाच लाख रुपये मंजूर झाले. बोरकुंड व आर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सोयी- सुविधांसाठी प्रत्येकी १५ लाख. बोरकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत प्रसूतिगृह व शिशुगृह दुरुस्तीसाठी १५ लाख मंजूर झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रस्त्यासाठी तालुक्यातील १९ गावांना प्रत्येकी १५ लाख, तर तीन गावांना प्रत्येकी ३० लाख मंजूर झाले. यात बोरकुंड, मोघण, जुनवणे, विसरणे, कुळथे, चांदे, तरवाडे, नाणे, तिखी, न्याहळोद, फागणे, बाभुळवाडी, मोरदड, मोरदड तांडा, अंचाळे, भिरडाई, नंदाणे, विंचूर, दोंदवाड, सीताणे, धाडरे, धाडरी आदी गावांचा समावेश आहे.
दरम्यान, इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व सचिव तथा जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई भदाणे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर पाटील यांनी धुळे ग्रामीणच्या विकासासाठी विविधांगी प्रयत्न सुरू केले आहेत.
"धुळे ग्रामीणमधील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकामंत्री दादा भुसे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे." - बाळासाहेब भदाणे, लोकनियुक्त सरपंच, बोरकुंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.