धुळ्याजवळ गाडी पूलावरून कोसळून सात जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

मध्य प्रदेशातून मोलमजूरीसाठी निघालेल्या महिला व लहान मुलांची पिकअप गाडी धुळ्याजवळील विंचूर येथे पूलावरून खाली पडली. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने व पूल अरूंद असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

धुळे : मध्य प्रदेशातून उस्मानाबादकडे जाणाऱ्या पिकव्हॅनचा विंचूरजवळ भीषण अपघात झाला असून, या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. काल (ता. 29) रात्री ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये 2 महिला तर 5 लहान मुलांचा समावेश आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

मध्य प्रदेशातून मोलमजूरीसाठी निघालेल्या महिला व लहान मुलांची पिकअप गाडी धुळ्याजवळील विंचूर येथे पूलावरून खाली पडली. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने व पूल अरूंद असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्या 7 जणांचा मृत्यू झाला होता, ते सर्व मोलमजुरी करणारे होते. उस्मानाबादकडेही ते मोलमजुरीसाठीच निघालेले असताना हा अपघात घडला. 

आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय 

या अपघातात इतर जण गंभीर जखमी झालेले असून त्यांना धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 dies in accident near Dhule