इगतपुरीत मुसळधार पाऊस, एकाच दिवसात 81 मिमी पाऊस

विजय पगारे
शनिवार, 7 जुलै 2018

इगतपुरी : इगतपुरी शहर, तालुका, कसाराघाट व पाश्चिम घाटमाथ्याच्या परिसरासह गेल्या चोवीस तासांपासून धुवाधार पाऊस सुरु असुन कालपासुन संततधारेसह झालेल्या पावसामुळे शहरासह पश्चिम भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात पुन्हा 81 मिलीमीटर  पावसाची नोंद घेण्यात आली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे पावसाने परिसरात दमदार हजेरी लावली आहे. कालपासुन झालेल्या दमदार पावसामुळे धरण साठ्यांमध्ये ही वाढ होण्यास मदत मिळत आहे. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातीत सरासरीच्या 900 चा आकडा आज पार केला असुन एकूण 916 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम व खेड्यापाडयाच्या भागात पावसाच्या सरी चौफेर तुफानी मारा करीत सर्वत्र जोरदार मुसंडी मारत असुन घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळूस्ते, त्रिंगलवाडी, बलायदुरी, वैतारणा, घोटी पट्टयात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेतीची कामे खोळंबली असुन शेतात जलमय स्थिती कायम राहीली असुन भात शेती व लागवडीला हा पाऊस पुरक असल्याचे चित्र दिसुन सध्या सर्वत्र येत आहे. 

दरम्यान संततधार सुरू असलेल्या पावसामुळे आज घोटीतील आठवडे बाजारावर व इगतपुरी शहरातील भाजी विक्रेते व लहान लहान व्यापाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान मागील महिन्यात भाजी बाजार परिसरात नगर परिषदने काही भागातील अतिक्रमण काढल्याने बरेच लहान व्यापारी, भाजी, फळ विक्रेत्यांना भर पावसात ओले व्हावे लागत आहे. पर्यायी जागा व्यापारींना नगरपरिषदेने दिली असती तर पावसात व्यापार करण्याची वेळ आली नसती अशी ओरड सध्या व्यापारी वर्गात आहे.

याबरोबरच सतंतधारेमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इगतपुरी शहरात गेल्या चोवीस तासात विक्रमी अशी 81मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाही पावसाने आपल्या सरासरीकडे आगेकुच सुरु केली असुन शेतकरी व सर्व सामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे. 

Web Title: 81 mm rain in igatpuri