A police team of city traffic control branch checking bullet riders in the city.
A police team of city traffic control branch checking bullet riders in the city. esakal

Dhule News : इंदोरी सायलेन्सर प्रकरणी दणका द्याच; फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारांवरील कारवाईचे स्वागत

Dhule News : शहरात फटाक्यांसारखा आवाज असलेल्या बुलेटवर कारवाई झाली पाहिजे. विशेषतः रात्रीही वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस पथकाने मोहीम हाती घेऊन अशा बुलेटस्वारांना कारवाईचा दणका दिला पाहिजे.

त्यांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा असंख्य धुळेकरांनी बुधवारी (ता. २६) व्यक्त केली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस पथकाने शहरात बुधवारी ही कारवाई सुरू केल्याने तिचे स्वागत झाले. यात कुठल्याही बुलेटस्वाराची गय करू नका, अशी प्रतिक्रियाही उमटली.

पोलिस प्रशासनाने शहर वाहतूक नियंत्रण शाखेची धुरा सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांच्यावर सोपविली आहे. या शाखेने शहरात वाहतुकीला शिस्त लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होते. (Action on bullets that sound like firecrackers in city dhule news)

या अनुषंगाने वर्दळीच्या आणि बेशिस्तपणाचा कळस गाठलेल्या आग्रा रोडवरील बाजारपेठेत श्री. कोते व पोलिस पथकाने कारवाईला सुरवात केली. तसेच पथकासह श्री. कोते यांनी फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई सुरू केली आहे. तिचे आज स्वागत झाले. अशा बुलेटला असंख्य नागरिक वैतागले आहेत.

धुळेकरांमध्ये मोठा रोष

काही दिवसांपासून वाडीभोकर रोडवरील जयहिंद संस्थेच्या ॲड. झुलाल भालाजीराव पाटील महाविद्यालय, एसएसव्हीपीएस महाविद्यालय आणि विविध भागात फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांनी कळस गाठला आहे.

वेगात वाहन न्यायचे, कानठळ्या बसविणारा आणि त्रस्त वाटणाऱ्या बुलेटद्वारे फटाक्यांचा आवाज काढायचा आणि त्यातून विचित्र आनंद घेण्याचा प्रकार अनेक बुलेटस्वारांमध्ये दिसून येत असतो. त्याला कायमस्वरूपी लगाम घालण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही. अधूनमधून कारवाई होत असल्याने बुलेटस्वारही निर्ढावले. मात्र, अशा बुलेटस्वारांविरुद्ध धुळेकरांमध्ये मोठा रोष आहे. त्यांना अनेक नागरिक दुषणे देतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A police team of city traffic control branch checking bullet riders in the city.
Dhule Crime News : दोंडाईचा येथे मिरची व्यापाऱ्यावर हल्ला; एक संशयित ताब्यात

कायमची अद्दल घडवा

दिवसाढवळ्या शाळा, महाविद्यालये, दवाखाने, व्यापारी पेठ पाहायची नाही, सुने रस्ते असल्याने रात्री दहानंतर आग्रा रोड, मोठा पूल यांसह विविध भागांत आपले कुणीही वाकडे करू शकत नाही, अशा आविर्भावात विचित्र आवाजाच्या बुटेल वेगाने चालवत आनंद घेण्याचा ट्रेंड शहरात दिसतो.

असे असताना वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस पथकाने अशा बुलेटस्वारांवर कारवाईतून अद्दल घडविण्याचे ठरविले असल्याने असंख्य नागरिकांमध्ये समाधानाचे चित्र उमटताना दिसत आहे. या समस्येची हाताळणी करताना पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवावी, अशीही प्रतिक्रिया जनमाणसात उमटली.

इंदोरी सायलन्सरला बंदी हवी

शहर वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी कोते यांच्या पथकाने जयहिंद चौकात बुधवारी कारवाईला सुरवात केली. यात दुपारी दोनपर्यंत सहा बुलेटधारकांची तपासणी करत त्यांच्याकडून प्रत्येकी हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बुलेटचे सायलेन्सर काढण्याचीही कारवाई करण्यात आली.

A police team of city traffic control branch checking bullet riders in the city.
Dhule News : शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे सचिन शिंदे यांचे आवाहन

यात फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या बुलेटला तशा पद्धतीचे सायलन्सर देणारे विक्रेते आणि ते बसवून देणारे गॅरेज, त्यांच्या कामगारांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही पुढे आली आहे. आरटीओच्या नियमानुसार कुठल्याही वाहनात फेरबदल करता येत नाही. तरीही नियम धाब्यावर बसवून बुलेटला विचित्र आवाजांचे सायलेन्सर बसविले जाते. कानठळ्या बसविणारे इंदोरी सायलेन्सर बाजारात विक्री आहेत. त्यास बंदी घालण्याचा प्रयत्न आरटीओ व पोलिसांमार्फत झाला पाहिजे.

विक्रेत्यांवर कारवाई व्हावी

या पार्श्वभूमीवर विचित्र आवाजाचे सायलन्सर विक्रेते व गॅरेजसह त्यांच्या कामगारांवरही कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी धुळेकरांकडून होत आहे. यापूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस पथकाने बुलेटच्या जप्त केलेल्या सायलेन्सरवर रोलर फिरवला होता. तरीही फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या बुलेटवर या कारवाईचा प्रभाव पडला नाही.

त्यामुळे वरवर कारवाई न करता पोलिसांनी आता यात सातत्य ठेवत याप्रश्‍नी कायमस्वरूपी तोडगा काढावा, हिरोगिरी करणाऱ्या बुलेटस्वारांना चांगली अद्दल घडवा, अशी मागणी जनमाणसातून होत आहे. कारवाईत श्री. कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील श्री. आखाडे, राजेंद्र पवार, प्रवीण नागरे, विवेक वाघमोडे, तौफिक शेख, विकास मालचे, मनोहर महाले सहभागी झाले होते.

A police team of city traffic control branch checking bullet riders in the city.
Dhule News : वलवाडीत रस्तेकामांसाठी 5 कोटी मंजूर : आमदार पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com