
धुळे : सोलापूर (जि. सांगली) येथील अडत व्यापाऱ्यांनी रुणमळी (ता. साक्री) येथील शेतकऱ्याची सव्वादोन लाखांत फसवणूक केली.
सोलापूर बाजार समितीत विक्री केलेल्या ५५३ कांदा गोण्यांचे पैसे बुडविले. पैसे मागितल्यावर उलट दमबाजी करीत ठार करण्याची धमकी दिली. (Adat traders cheated farmer to two and half lakhs dhule fraud crime news)
सचिन नरेंद्र पवार (रा. रुणमळी, ता. साक्री) या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार ५ सप्टेंबर २०२२ ला रात्री आठच्या सुमारास सचिन पवार यांच्या रुणमळी शिवाराच्या शेतातील ५५३ कांदा गोणी कांद्याची अडत व्यापारी राजकुमार रामचंद्र माशाळकर व नारायण रामचंद्र मासळकर (रा. गाळा क्रमांक १५२, श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड, सोलापूर, जि. सांगली) यांनी विश्वास संपादन करून सोलापूर बाजार समितीत विक्री केली.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
मात्र, कांदा विक्रीचे खर्चवजा प्राप्त दोन लाख ३३ हजार ८९५ रुपये शेतकरी पवार यांना दिले नाहीत. त्याबाबत विचारपूस केली असता दोघांनी शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिली. दोघांनी कांदा विक्रीचे पैसे हडप करून फसवणूक केली. या प्रकरणी दोघा व्यापाऱ्यांवर निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.