चौथ्या हप्त्यानंतरही लाखभर शेतकऱ्यांसमोर संभ्रमच... 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकेक दोन हजारांचा हप्ता थेट खात्यात जमा झाला. आतापर्यंत या योजनेत चार हप्ते जमा झाले आहेत. ठराविक दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या बॅच करून ती माहिती केंद्राकडे पाठविली जाते. त्या माहितीती खातरजमा करणे, बॅंक खाते, आधार क्रमांक जुळविण्यासह अनेक माहिती अपलोड करताना त्यात स्पेलिंग मिस्टेक, बॅंक खात्यातील नावातील फरकापर्यंत अनेक त्रुटींमुळे मदत मिळत नाही. 

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात "पंतप्रधान किसान सन्मान' योजनेच्या मदतीचा चौथा हप्ता गुरुवारी (ता. 22) केंद्राकडून जमा झाला. आतापर्यंत या योजनेचे चार हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. मात्र, सन्मान योजनेत नाशिक विभागात अर्ज केलेल्या किमान लाखभर शेतकरी असेही आहेत, की ज्यांना अजून पहिलाही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे संबंधितांना अपात्र ठरवले, की माहिती अजून जुळते आहे याविषयीही संभ्रमावस्था कायम आहे. 

क्लिक करा >  नाहीतर ५० प्रवाशांचा जीव धोक्‍यात गेला असता. 

नावातील फरकांसह इतर त्रुटींमुळे काही जण वंचित 
पंतप्रधान किसान सन्मान योजनेची घोषणा झाली. आचारसंहितेच्या तोंडावर योजनेचा लाभ देण्यासाठी घाईघाईत कालबद्ध कार्यक्रम आखून जिल्हानिहाय शेतकऱ्यांची माहिती संकलित केली गेली. माहिती संकलनानंतर संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याच्या कामाला पुन्हा गती दिली गेली. सगळी कामे दुय्यम राहून त्या वेळी पंतप्रधान किसान सन्मानची माहिती अपलोड करण्यास प्राधान्य दिले गेले. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकेक दोन हजारांचा हप्ता थेट खात्यात जमा झाला. आतापर्यंत या योजनेत चार हप्ते जमा झाले आहेत. ठराविक दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या बॅच करून ती माहिती केंद्राकडे पाठविली जाते. त्या माहितीती खातरजमा करणे, बॅंक खाते, आधार क्रमांक जुळविण्यासह अनेक माहिती अपलोड करताना त्यात स्पेलिंग मिस्टेक, बॅंक खात्यातील नावातील फरकापर्यंत अनेक त्रुटींमुळे मदत मिळत नाही. 
 
क्लिक करा > PHOTO : बेधडक कारवाईत मटका जुगारअड्‌डा उद्‌ध्वस्त

पहिला हप्ताही नाही 
लाभार्थ्यांच्या थेट खात्यात मदतीचे नियोजन असलेल्या उपक्रमात मदत थेट केंद्राकडून जमा होते. त्यात कोण पात्र कोण अपात्र ठरले, कुणाच्या नावात इंग्रजीतील अद्याक्षरा(स्पेलिंग मिस्टेक)सारख्या चुका आहेत, हे मात्र शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे अजूनही एकेका जिल्ह्यात लाख लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांना पहिला हप्ताही जमा नाही. लाभासाठी अपात्र ठरले, की माहिती भरण्यातील त्रुटी हे मात्र अजूनही अनेकांना कळलेच नाही. एकट्या नाशिक विभागात ही संख्या एक लाखाहून अधिक आहे. सहा महिने होऊनही पहिला हप्ताही मिळालेला नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the fourth installment,confusion in front of millions of farmers