Ahilyanagar Municipal Election
esakal
Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आपापल्या प्रभागांतील लेखाजोखा मांडत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. तेथेच शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पंख तुटले. राष्ट्रवादीला (शरद पवार) उमेदवार मिळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.