Dhule Leopard Attack : मुक्या प्राण्यांमुळे मालकाचे वाचले प्राण!

leopard attack
leopard attackesakal
Updated on: 

Dhule Leopard Attack : जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर बिबट्या व त्याच्यासोबत असलेल्या बछड्यांनी हल्ला केल्याची घटना दलेलपूर (ता. तळोदा) येथे गुरुवारी (ता. २४) दुपारी घडली.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाच्या सुदैवाने पाळलेल्या म्हशींनी बिबट्या व त्याच्या बछड्यांच्या प्रतिकार करीत, त्यांना हुसकावून लावले. मुक्या प्राण्यांमुळे मालकाचे प्राण वाचले असून, या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. ( animal saved owner life from leopard attack dhule news)

तळोदा शहरातील कॉलेज रोड परिसरात बादशाह अर्जुन भरवाड राहत असून, त्यांच्या मालकीच्या म्हशी व गायी आहेत. त्यांना चारण्यासाठी ते परिसरातील विविध भागांमध्ये नेहमीच जात असतात. गुरुवारीदेखील ते नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. दलेलपूर शिवारातील डिगंबर सूर्यवंशी यांच्या केळीच्या शेतात म्हशी नेल्या होत्या.

दरम्यान, त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेला बिबट्या व दोन बछड्यांनी दुपारी बादशाह भरवाड यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते दचकले, मात्र त्यांनी बिबट्यांचा प्रतिकार सुरू केला, त्यांनी आपला उजवा हात पुढे केल्याने बिबट्याने हाताला चावा घेतला व त्यांना जखमी केले.

बिबट्यासोबतच्या झटापटीत ते जमिनीवर पडले. त्या परिस्थितीत बिबट्या त्यांच्यावर पुन्हा हल्ला करणार तेवढ्यात सोबत असलेल्या म्हशींनी बिबट्यांना शिंगांनी मारण्यास सुरवात केली. म्हशींनी जोरदार प्रतिकार करीत बिबट्या व बछड्यांना तेथून हुसकावून लावले. एकंदरीत मुक्या जनावरांमुळे आज मालकाचा जीव वाचला असल्याचे सर्वत्र चर्चिले जात होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

leopard attack
Nandurbar Leopard Attack : बिबट्याचा हल्ल्यात 10 वर्षीय बालकाचा मृत्यू

बिबट्यांची दहशत वाढली

रात्रीतून किंवा काही वेळा दिवसादेखील शेतातील पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ले करून त्यांना फस्त केल्याचा घटना तालुक्यात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. पण आता दिवसाढवळ्यादेखील अनेक जणांना बिबट्याचे दर्शन होत आहे, इतकेच काय तर बिबटे आता मनुष्यालादेखील लक्ष करीत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तळोदा वन विभागाने प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे बोलले जात आहे.

"नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेलो असता आज अचानक केळीच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या व दोन बछड्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यात माझ्या उजव्या हाताला त्याने चावा घेतला व मी खाली कोसळलो. सुदैवाने माझ्या म्हशींनी बिबट्या व बछडे यांचा प्रतिकार करत त्यांना पळवून लावले, त्यामुळे आज माझा जीव वाचला." -बादशाह भरवाड, तळोदा

leopard attack
Nandurbar Leopard Attack : रांझणीत बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी; बालकाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ भयभीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahmednagar Leopard Attack 65 Year Old Mother Fights Leopard With Sickle To Save Herself And Her Son
Ambegaon Leopard Attack Farmer Escapes Safely After Leopard Jumps From Sugarcane Field Forest Department Installs Cage
leopard enters house in Sangameshwar Ratnagiri
Maharashtra Leopard Attack Update Pet Dog Tiger Prevents Midnight Leopard Attack on Calf in Purandar Village
Marathi News Esakal
www.esakal.com