पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी परिषदेचे आयुक्तांना निवेदन

विजय पगारे 
शुक्रवार, 23 मार्च 2018

इगतपुरी : आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या पेसा कायद्या अंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व स्थानिक आदिवासी युवकांमधुन शिक्षकांची पदे भरण्यात यावीत या मागणीचे निवेदन आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक  आदिवासी विकासचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांना देण्यात आले. 

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यपाल महोदयांच्या जून 2014 च्या अध्यादेशानुसार आदिवासी क्षेत्रातील बारा संवर्गातील विविध पदे स्थानिक आदिवासी उमेदवारांमधुन भरण्या बाबत आदेश असताना देखील आदिवासी विकास यंत्रणेकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. यामुळे स्थानिक उमेदवारांचा हक्क असूनही त्यांना वंचित ठेवले जाते. 

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही प्रकारची भरती झालेली नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवार योग्य पात्रतेचे शिक्षण घेउनही नोकरी पासून वंचित राहिले आहे. यामुळे आपल्या कार्यालयामार्फत करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे व पेसा कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उत्तर महाराष्ट संपर्कप्रमुख दौलत मेमाणे, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गौळी, विनायक भले, आकाश भले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Appeal to Commissioner of Tribal Council for implementation of PESA Act