Dhule News : दोंडाईचा बाजार समितीत गहू, मकाची आवक वाढली; शेतकरी हतबल

The desperation on the faces of the farmers who came to sell wheat and gram in the Agricultural Produce Market Committee
The desperation on the faces of the farmers who came to sell wheat and gram in the Agricultural Produce Market Committeeesakal

Dhule News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक चार हजार क्विंटलपेक्षा जास्त वाढली आहे. हरभरा, मकाची आवकही वाढली आहे. भाव मात्र जैसे थे आहेत. (arrival of gram maize has also increased But price is not increased dhule news)

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस याचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बसला आहे. अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.

सोमवारी (ता. १०) बाजार समितीत गहू आवक चार हजार दोनशे क्विंटल झाली. त्यास सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये, तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे पन्नास रूपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. किमान तीन हजार रुपये भाव गहुला मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मक्याची आवक अडीच हजार क्विंटल होती. त्यास दीड हजार ते दोन हजारपर्यंत भाव मिळाला. हरभरा आवक एक हजार दोनशे क्विंटलपर्यंत होती. त्यास सात हजारपासून ते सात हजार सहाशेपर्यंत भाव दिला गेला. किमान आठ हजार रुपये भाव दिला जावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

The desperation on the faces of the farmers who came to sell wheat and gram in the Agricultural Produce Market Committee
Dhule News : कॅफेचालकांवर गुन्हा दाखल करा : महापौर चौधरी

दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन काढणीस आले असताना तालुक्यात ठिकठिकाणी गारपीट, अवकाळीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. उत्पादनाची प्रत घसरली. परिणामी अपेक्षित भाव मिळात नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

परिसरात ढगाळ वातावरणात असहाय्य उकाड्याने शेतकरी हैराण झाला आहे. कांदा काढण्याची लगबग सुरू असताना पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे तारांबळ उडाली. कांदा पिकाला किमान दहा रूपयेसुद्धा भाव मिळत नसल्याने भांडवलदेखील निघणार नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या बोझाखाली दाबला जाणार आहे.

The desperation on the faces of the farmers who came to sell wheat and gram in the Agricultural Produce Market Committee
Dhule News : मोबदला घेणारी ‘एमजेपी‘ नामानिराळी कशी? वेळीच जाब विचारण्याची, लक्ष घालण्याची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com