VIDEO : याड लावलं बुवा याने..जेजुरी वारीची परंपरा जोपसणारा 'हा' आहे तरी कोण?

ज्ञानेश्‍वर गुळवे : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

संपूर्ण जिल्ह्यात आपल्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकत आलेल्या नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे दरवर्षी न चुकता आपल्या अश्‍वाला गडावर घेऊन जातात. गडाला असणाऱ्या 385 पायऱ्या हा अश्‍व काही तासांतच चढून दोन पाय जमिनीवर ठेवून खंडोबाला लोटांगण घालतो. गडाच्या पायऱ्यांना नऊ लाख दगड वापरले गेल्यामुळे नऊ लाख पायऱ्या असा उल्लेख आढळतो. हा सुवर्णक्षण पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. यानंतर गडावर राज्यभरातून आलेल्या अश्‍वांच्या नृत्याची जुगलबंदी होते. डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्याविष्कार पाहून भाविक भारावून जातात.

नाशिक : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त मोठा उत्सव साजरा होतो. या उत्सावात महाराष्ट्रातील नृत्य सादर करणारे अश्‍व भाविक घेऊन येतात. त्यात इगतपुरीतील नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे यांचाही अश्‍व अनेक वर्षांपासून सहभागी होऊन चंपाषष्ठीला जेजुरीची वारी करीत आहे. 

नांदूरवैद्यचा अश्‍व जोपासतोय जेजुरी वारीची परंपरा 

संपूर्ण जिल्ह्यात आपल्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकत आलेल्या नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे दर वर्षी न चुकता आपल्या अश्‍वाला गडावर घेऊन जातात. गडाला असणाऱ्या 385 पायऱ्या हा अश्‍व काही तासांतच चढून दोन पाय जमिनीवर ठेवून खंडोबाला लोटांगण घालतो. गडाच्या पायऱ्यांना नऊ लाख दगड वापरले गेल्यामुळे नऊ लाख पायऱ्या असा उल्लेख आढळतो. हा सुवर्णक्षण पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. यानंतर गडावर राज्यभरातून आलेल्या अश्‍वांच्या नृत्याची जुगलबंदी होते. डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्याविष्कार पाहून भाविक भारावून जातात. नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांतर्फे खंडोबाचा अभिषेक करण्यात येतो. अश्‍वाबरोबर संपूर्ण मंदिराला वाजतगाजत फेरी मारली जाते. यानंतर गडावरच तयार करण्यात आलेला नैवेद्य खंडोबाला दाखवून महाप्रसादाचे वाटप केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अश्‍वप्रेमी कर्पे कुटुंब दर वर्षी न चुकता जेजुरी गडावर जाऊन खंडोबाची सामुदायिक आरती करतात. 

प्रतिवर्षी चंपाषष्ठीला गडावर खंडोबाचरणी लोटांगण 
पहिल्यापासून आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य पशूप्रेमी आहेत. यामुळे खंडोबाचे वाहन असलेला अश्‍व जेजुरी गडावर नेऊन त्याच्यासोबत दर्शन घेणे आम्हाला आनंद देते. त्यामुळे आमच्याकडे नृत्य करणारे अश्‍व असल्यामुळे आम्ही अनेक वर्षांपासून दर वर्षी गडावर दर्शनासाठी घेऊन जातो.- कैलास कर्पे 
 हेही वाचा >पोलीस असल्याचे सांगून 'ते' भररस्त्यात पैसे मागत होते 

               > लाखमोलाचा "त्यांचा' जीव यामुळे वाचला...

               >प्रेम केलय...आंतरजातीय असलो म्हणून ठार मारणार का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwa Horse maintains the tradition of Jejuri Wari Nashik Marathi News