शाब्बास गुरुजी : 'या' शाळेची सर्वांगिण गुणवत्तेला गवसणी 

vilholi school.jpg
vilholi school.jpg

इगतपुरी  : तंत्रज्ञान व अध्यापन यांची जोड एकत्र केल्यास विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे खुप सोप असतं हे सिध्द केलय विल्होळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ..शाळेला गावाचा अन् शिक्षकांना शाळेचा आधार वाटून सर्वांना अभिमान वाटावा असे वातावरण विल्होळीतील गावकरी व शिक्षक यांनी निर्माण केले. यात पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने शाळा सर्वांगीण विकासात तालुकास्तरावर प्रथम येणेसाठी प्रयत्नशील झाली आहे.

उपक्रमशील शिक्षक प्रशांत शेवाळे यांच्या धडपडीला यश 

मुख्याध्यापक रविंद्र भदाणे व केंद्रप्रमुख मोहन रणदिवे यांनी शाळेचे रुप बदलण्यासाठी खूणगाठ बांधून सर्व शिक्षकांना विश्वासात घेवून कृतीतून बाह्यरुप बदलणे यासाठी उपक्रमशीलता व प्रत्येकाची कल्पकता याठिकाणी कामाला आली आहे. उपक्रमशील शिक्षक प्रशांत शेवाळे यांनी कामाला सुरुवात केली. त्यांच्या समवेत सर्व शिक्षकांनी विविध उपक्रमांबरोबरच वृक्षारोपण, संगणक कक्ष बाह्य रंगकाम, शाडू मातीचे गणपती, राखी बनविणे यांसारखे उपक्रम राबवुन आपापली उपक्रमशीलता सिध्द केली आहे 

अशी आहे प्रत्येक शिक्षकाची उपक्रमशीलता... 
इयत्ता सहावी, सातवी वर्गांची शिस्तबद्ध परेड, शनिवारी मंगला पाटील यांची योगासने, संगिता नागपूरे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, परिपाठाची सुंदर तयारी, शितल शिंदे यांचा स्मार्ट क्लास, आशालता फलके यांचे वर्गातील शैक्षणिक उपक्रम, दिगबर गोसावी यांची सेमी इंग्रजीची सुरुवात, पुनम बच्छाव यांचे शिष्यवृत्तीतील यश ,अरुणा सोनवणे यांचा सुंदर लेखन उपक्रम, प्रशांत शेवाळे यांचे गणित विज्ञान प्रयोग, किरण पगारे यांचे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी स्वागत उपक्रम,आशा चौधरी यांचा अँक्टिव्ह क्लास तर सुवर्णा पवार यांचा उपस्थिती फलक या सर्व विविधांगी उपक्रमातुन शाळा दर्जेदार होण्यास मदत झाली. मुख्याध्यापक रविंद्र भदाणे यांची एकजुटीने काम करणेची तयारीने शाळा सर्वागसुंदर व गुणवत्तापुर्ण झाली आहे. 

नालंदा प्रकल्पातुन ४० विद्यार्थी घेताएत टँबद्वारे तंत्रज्ञानाचे शिक्षण  

विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांनी तर विज्ञान प्रयोगशाळा बांधकामासाठी स्वतः रुपये अडीच लाख देवून बांधकाम करुन शाळेच्या रुपात भर टाकली. महाराष्ट्र शासनाने साडे सात लाखाची नाविन्यपुर्ण विज्ञान प्रयोगशाळेत सर्व साहीत्य देवून वैज्ञानिक प्रयोग करणेस ४०० विद्यार्थांना संधी दिली. नालंदा प्रकल्पांतर्गंत सेमी इंग्रजी वर्गांसाठी ४० टँबपैकी २० टँब दिले आहेत. 

प्रत्येक शिक्षकांची नियोजनबध्द आखणी
परिपाठापुर्वीच १०० टक्के विद्यार्थी हजर राहुन शाळेचा दिनक्रम सुरु होतो. दुपारी उत्कृष्ट शालेय पोषण आहार ते सायंकाळी वंदेमातरम पर्यंत प्रत्येक शिक्षकांची नियोजनबध्द आखणीमुळे एकजूटीने शाळा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर झाली.प्रत्येक वर्गांची एक तुकडी सेमी इंग्रजी असल्याने अँडमिशनला गर्दी असते. इंग्रजी माध्यमाची मुले या शाळेत दाखल झाली. शाळेच्या पहील्याच दिवशी पहिलीला सत्तर मुले दाखल झाली हे शाळेचे खरे यश आहे.

विद्यार्थ्यांच्या  सर्वांगिण विकासामुळे पालकांमध्ये आनंद

 प्रत्येक वर्गांत डिजिटल साहित्याचा वापर, प्रोजेक्टर एलईडी, क्युआर कोड, पालक व्हाँटसअँप ग्रुपमूळे विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेतील सर्व उपक्रमांची माहीती होते. तर युट्यूब लिंकद्वारे पालक आपल्या मुलांना शिक्षकांनी पाठवलेल्या लिंकद्वारे अभ्यासात मदत करतात. शाळेच्या शिस्तबद्ध परेडमुळे सर्व पालकांना अभिमान वाटतो. चित्रकला स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धेत विद्यार्थांना यश मिळाले. पाचवी शिष्यवृत्तीचे घवघवीत यश यामूळे पालकांमध्ये आनंद आहे.

विल्होळी शाळेतील विविधांगी उपक्रम 
नालंदा प्रकल्प 40 टँबद्वारे अध्ययन, नाविन्यपुर्ण विज्ञान प्रयोगाशाळा, कर्मवीर वाचनालय, शिस्तबद्ध परेड, संगणक शिक्षण, सेमी इंग्रजी वर्ग, प्रशस्त इमारतीसह शैक्षणिक वातावरण, दैंनंदिन गृहपाठ, श्रृतलेखन उपक्रम, भाषा, गणित, विज्ञान पेटीचा दैंनदिन वापर, सिसीटीव्ही कँमेरा आदी

प्रतिक्रिया 
विल्होळी शाळेतील सर्व शिक्षक तन,मन,धनाने शाळेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देतांना एकजूटीने काम करतात. शासनाचा प्रत्येक उपक्रम मोठ्या हिरहिरीने करतात - मोहन रणदिवे ,केंद्रप्रमुख, पिंपळद

प्रत्येक शिक्षक, पालक व गावकरी एकमनाने काम करुन विद्यार्थी हित लक्षात घेवून शाळेतील शंभर टक्के वेळ शाळेसाठी देतात. म्हणून आदर्श शाळा तयार करुन भारताचे चांगले नागरिक तयार करण्याचे काम एकजुटीने शाळेत होते याचा अभिमान वाटतो  - रविंद्र भदाणे ,मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, विल्होळी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com