
Dhule News : रहदारीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आल्या हटविण्यात; पालिका प्रशासनाची कारवाई
दोंडाईचा (जि.धुळे) : येथील स्टेशन भागातील राजपथ मार्गावरील वाहतुकीस (Traffic) अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, हातगाड्या हलविण्यात आल्या. (At Dondaicha shops obstructing traffic were removed by municipal corporation dhule news)
नगर परिषदेच्या या कारवाईमुळे राजपथावरील श्र्वास मोकळा झाला आहे.दरम्यान, भविष्यात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या जप्त करण्यात येतील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील बसस्थानक परिसरात दिवसेंदिवस टपऱ्या-हातगाड्या रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा ठरत आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे बुधवारी (ता. १५) दुपारी तीस ४० टपरीधारक, हातगाडी हटविण्याची कारवाई पथकाकडून करण्यात आली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
या मोहिमेत मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, अभियंता शिवानंद राजपूत, जगदीश पाटील, आरोग्य निरीक्षक शरद महाजन आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
"नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. रहदारीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, हातगाड्या हलविण्यात आल्या. भविष्यात रस्त्यावर असणाऱ्या टपऱ्या-हातगाड्या पालिकेकडून जप्त केल्या जातील."-देवेंद्रसिंग परदेशी, मुख्याधिकारी, दोंडाईचा