बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंद चे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

शहादा: बहुजन क्रांती मोर्चातर्फे चरणबद्ध आंदोलनाचा अंतिम टप्पा म्हणून सीएए आणि एन आर सी विरोधात उद्या (ता.२९)वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

शहादा: बहुजन क्रांती मोर्चातर्फे चरणबद्ध आंदोलनाचा अंतिम टप्पा म्हणून सीएए आणि एन आर सी विरोधात उद्या (ता.२९)वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजप सरकारचा गत पाच वर्षातील अपयशाने त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडालेला आहे. यामुळे घोटाळे ,देशातील आर्थिक दिवाळखोरी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या अनेक प्रकारचे अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार सीएए आणि सारख्या एनसीआर एनपीआर सारख्या मुद्द्याच्या आधारे देशात अशांतता निर्माण करीत आहे. याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून २० डिसेंबरपासून फ्री आंदोलनाला सुरुवात झाली आहे. याचा दुसरा टप्पा आठ जानेवारी तर तिसरा टप्पा उद्या (ता.२९) आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चासोबत अनेक समविचारी संघटनांनी उद्याचा भारत बंदची घोषणा केली आहे

मुख्यमंत्र्यांच्या खर्चास भाजप नगरसेवकांचा विरोध

नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये यासाठी संवैधानिक आणि सनदशीर मार्गाने विविध संघटनांना व्यापारी प्रतिष्ठानच्या प्रमुखांना संपर्क करून बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे शहादा शहरातून राहुल शिंदे नंदुरबार मधून लाल मोहम्मद खान पिंजारी तलोद्यातून राजू केदारे अक्कलकुवा यातून बामण्या पाडवी धडगाव वरून पौर्णिमा केदारे तर नवापूर मधून नीलेश गावित यांनी या बंद चे आवाहन केले आहे.

महाआघाडीत खिंडार पाडण्यात अखेर भाजप यशस्वी

सहभागी संघटना

या मोर्चाला अखिल भारतीय आदिवासी महासंघ, आदिवासी एकता परिषद, भारतीय ट्रायबल पार्टी, एकलव्य आदिवासी युवा संघटना, भिलिस्तान टायगर सेना, आदिवासी कोकणी-कोकणा सामाजिक संघटना, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, गुरू रविदास नोकरदार मैत्री संघ, राष्ट्रीय ख्रिचन मोर्चा, इंडियन लॉयर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, प्रोटॉन,भारतीय विद्यार्थी मोर्चा , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ,बहुजन क्रांती मोर्चा,भारत मुक्ती मोर्चा , छत्रपती क्रांती मोर्चा, इब्टा शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, जमियत ए उलमा ए हिंद, राजमाता रमाई महिला मंच, ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन, भीम आर्मी, बी एस पी, अखिल भारतीय परिवर्तन संघ, या संघटनांनी २९ जानेवारीच्या भारत बंद मध्ये सहभाग आणि समर्थन जाहीर केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahujan Kranti Morcha appeals today to Bharat Band