नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भुजबळ-राऊत करणार शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

नाशिक जिल्हा परिषदेच्या 73 सदस्यांत शिवसेना 25, राष्ट्रवादी कॉंग्रेस 16, कॉंग्रेस 8, भाजप 15, माकपचे 3 आणि 5 अपक्ष सदस्य आहेत. यामध्ये कॉंग्रेसच्या विद्यमान उपाध्यक्षा नयना गावित आणि अपक्ष शंकर धनवटे हे शिवसेनेकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ 43 होते. कॉंग्रेसमध्ये दोन गट आहेत. त्यांच्या भूमिकेवर त्यांचे अस्तित्व असेल. 

नाशिक :नाशिक जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचा अध्यक्ष तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपाध्यक्ष हे निश्‍चित झाले असून मंत्री छगन भुजबळ आणि खासदार संजय राऊत सोमवारी यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 73 सदस्यांत शिवसेना 25, राष्ट्रवादी कॉंग्रेस 16, कॉंग्रेस 8, भाजप 15, माकपचे 3 आणि 5 अपक्ष सदस्य आहेत. यामध्ये कॉंग्रेसच्या विद्यमान उपाध्यक्षा नयना गावित आणि अपक्ष शंकर धनवटे हे शिवसेनेकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ 43 होते. कॉंग्रेसमध्ये दोन गट आहेत. त्यांच्या भूमिकेवर त्यांचे अस्तित्व असेल. 

गिरीष महाजनांचा दुसऱ्यांदा अपेक्षाभंग
शरद पवार यांनी ज्याचे सदस्य अधिक त्यांचा अध्यक्ष अशी भूमिका ठरवली आहे. त्यामुळे गत निवडणूकीत भाजप बरोबर गेल्याने संधी हुकलेली 'राष्ट्रवादी' सत्तेत येणार तर भाजपची सत्ता यावी यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्‍न केलेल्या गिरीष महाजनांचा दुसऱ्यांदा अपेक्षाभंग होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी सदस्यांची बैठक माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत झाली. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार सदस्य आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निश्‍चित केले जातील, असे भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादी भवनामध्ये झालेल्या बैठकीसाठी सभापती पगार, अपर्णा खोसकर, गटनेते उदय जाधव, डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, संजय बनकर, सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, महेंद्र काले, अमृता पवार, नूतन आहेर, भास्कर भगरे, यशवंत शिरसाठ यांनी भाग घेतला.

हेही वाचा > पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय? 

इच्छुकांची नागपूरवारी...
शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी  नागपूरला नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातील काही सदस्य शुक्रवारी परतले. मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. सर्वानुमते उमेदवार देण्याचा 'फॉर्म्युला' निश्‍चित केला आहे. विधिमंडळ अधिवेशनानिमित्त सर्वच पक्षांचे नेते नागपूरमध्ये असल्याने सदस्यांनी "लॉबिंग'साठी नागपूरकडे मोर्चा वळविला होता. राष्ट्रवादीचे सभापती यतीन पगार, शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर, समाधान हिरे यांसह विविध सदस्य त्यात आहेत.

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhujbal-Raut will decides Nashik Zilla Parishad's presidency political marathi news