Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'तरीही मी अर्ज भरलाय'

टीम ई-सकाळ
Tuesday, 1 October 2019

जळगाव : भारतीय जनता पक्षातर्फे पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याच्या सर्व मतदार संघातील नावे जाहिर करण्यात आली आहे. त्यात मुक्ताईनगर मतदार संघाचे नाव मात्र वगळण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव : भारतीय जनता पक्षातर्फे पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याच्या सर्व मतदार संघातील नावे जाहिर करण्यात आली आहे. त्यात मुक्ताईनगर मतदार संघाचे नाव मात्र वगळण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान खडसे यांनी आज मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पहिल्या यादीतून खडसे,तावडेंना डावलले 

शिवसेना लहान भाऊच, मिळाल्या 124 जागा

भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यातील 125 मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात पक्षाकडे असलेल्या सात जागा पैकी सहा जागांचे उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत. त्यात फक्त मुक्ताईनगर मतदार संघातील उमेदवार जाहिर करण्यात आले नाही. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपच्या यादीत बीड जिल्ह्यातील चारच नावे

एकनाथराव खडसे यांनी मात्र आज मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पहिली यादी जाहीर झाली आहे, त्यात माझं नाव आहे की नाही मला माहित नाही. मात्र, मी अर्ज भरलेला आहे तो भरलेला राहील असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader eknath khadse first reaction after not named in first candidate list