सावकार बंबच्या लॉकरची तपासणी; मिळाले पुन्हा घबाड

अवैध सावकार व एलआयसी एजंट राजेंद्र बंब याच्या एका पतसंस्थेतील लॉकरकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मोर्चा वळविला.
Money
Moneyesakal

धुळे : येथील अवैध सावकार व एलआयसी एजंट राजेंद्र बंब याच्या एका पतसंस्थेतील लॉकरकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मोर्चा वळविला. त्यात बुधवारी दिवसभर मशिनने नोटा मोजण्याचे सुरू झालेले कामकाज रात्रीपर्यंत सुरू होते. लॉकरमध्ये कोट्यवधींची रोकड, अडीचशे ठेव पावत्या (एफडी) आणि विविध कागदपत्रे हाती लागली आहेत.

संबंधित पतसंस्थेच्या लॉकरमध्ये खरेदी खत, सौदा पावत्या, गहाण खत व अन्य कागदपत्रांसह कोट्यवधींची रोकड आणि तब्बल अडीचशे ठेव पावत्या रात्रीपर्यंत हाती लागल्या आहेत. फिर्यादी जयेश दुसाने याने आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केलेल्या पहिल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई सुरू झाली. सावकार बंब याच्याकडे आतापर्यंत दहा कोटीहून अधिक रोकड, अडीच हजार ठेव पावत्या, शेकडो गहाण खते, खरेदी खते, सौदा पावत्या सापडल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून झालेल्या संबंधित पतसंस्थेमधील लॉकर तपासणीत आढळलेल्या मुद्देमालाबाबत पोलिस प्रशासनाकडून गुरुवारी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

Money
Nashik : स्मार्टसिटी कामांची पावसाकडून पोलखोल

दरम्यान, देवपूर पोलिस ठाण्यात शिवसेनेचा पदाधिकारी व अवैध सावकार नितीन उर्फ बबन थोरात याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी देवपूर, आझादनगर पोलिस ठाणे व एलसीबीच्या पथकाने थोरात याच्या मनमाड जीनमधील निवासस्थानी व बाजार समिती मागील मालकीच्या मंगल कार्यालयात बुधवारी रात्री साडेआठपर्यंत कागदपत्रे शोधासाठी तपासणी, झाडाझडती सत्र राबविले.

Money
मविआतून बाहेर पडायला तयार, पण..; राऊतांची एकनाथ शिंदेंना अट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com